Nora Fatehi  esakal
मनोरंजन

Nora Fatehi : 'नोरा जॅकलीनवर जळायची!' मला म्हणायची, 'तू तिला...' सुकेशचा धक्कादायक खुलासा

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझ आणि नोरा फतेही यांच्यातील मोठा वाद आता समोर आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

sukesh chandrasekhar On Nora Fatehi: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझ आणि नोरा फतेही यांच्यातील मोठा वाद आता समोर आला आहे. दोनशे कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी सुकेश चंद्रशेखरला ईडीनं अटक केली आहे. त्यानं त्याच्या जबाबात त्याचे बॉलीवूड कनेक्शनविषयी काही धक्कादायक खुलासे केले आहे.

तिहार जेलमध्ये असणाऱ्या सुकेश चंद्रशेखरला भेटण्यासाठी अनेक बॉलीवूडमध्ये अभिनेत्री गेल्या होत्या. यासगळ्यात सुकेशनं नोरा फतेहीबाबत खुलासा केला आहे. सुकेशनं जॅकलीनला लाखो रुपयांचे गिफ्ट दिले होते ही गोष्टही तपासातून समोर आली आहे. महागड्या भेटवस्तु, कपडे, दिले होते. केवळ जॅकलीनलाच नाहीतर तिच्या घरच्यांना देखील त्यानं दिलेल्या वस्तुंविषयी ईडीनं चौकशी केली होती.

आता सुकेशनं त्याच्या वकीलांकडून एक पत्र माध्यमांमध्ये प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये त्यानं काही धक्कादायक खुलासे केले आहेत. तो खुलासा नोरा फतेही आणि जॅकलीनच्या बाबत आहे. नोराची पोलखोल सुकेशनं त्या पत्रात केली आहे. नोरानं थेट जॅकलीनवर आरोप केले आहेत. नोरानं सुकेशवर आरोप केला होता की, मी त्याची गर्लफ्रेंड होऊ म्हणून सुकेश सतत प्रयत्नशील होता.

Also Read - प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

नोराच्या आरोपांना उत्तरं देताना महत्वाचे खुलासे सुकेशनं केले आहे. तो म्हणतो, जॅकलीन आणि नोरा या अभिनेत्रींमधील वाद समोर आले आहेत. नोरा मला तिच्याविषयी वाईट सांगायची. नोराला जॅकलीनचा राग होता. ती तिच्यावर जळायची. मी जॅकलीनला सोडून टाकावं असा नोराचा आग्रह होता. मी आणि जॅकलीन सीरियस रिलेशनशिपमध्ये होतो. त्यामुळेच नोरा तिचा दुस्वास करत असे. असे सुकेशनं म्हटलं आहे.

नोराला वाटायचं की मी जॅकलीनला सोडून तिलाच डेट करावं. हे सगळं सुकेशनं त्या पत्रातून सांगितले असून ते व्हायल झाले आहे. सोशल मीडियावर नोरा आणि जॅकलीन या दोन्ही अभिनेत्री प्रचंड ट्रोल होताना दिसून आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT