not just for pathaan movie but Shah Rukh Khan family celebrates all hindu festivals sakal
मनोरंजन

Shah Rukh Khan Pathaan: तो फक्त चित्रपटासाठी मंदिरात गेला नाही.. तर हिंदूंचे हे सणही करतो साजरा..

मुस्लिम असूनही शाहरुख खान हिंदूंचे सण दिमाखात साजरी करतो, मग तरीही त्याला विरोध का? अशी चर्चा आता सुरू आहे.

नीलेश अडसूळ

shah rukh khan pathan movie trolled: किंग खान शाहरुख खान आणि त्याचा 'पठाण' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिकाने भगवी बिकिनी घातल्याने हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. या चित्रपटावर बहिष्काराची मागणी होत आहे. शिवाय चित्रपट प्रदर्शनापूर्वी शाहरुख वैष्णवी देवीच्या दर्शनाला गेल्याने चित्रपटासाठी हिंदी देवतांकडे धाव घेत असल्याची टिकाही त्याच्यावर झाली. पण ही टीका करणाऱ्यांचा अभ्यास कमी पडतोय असं म्हणायला हरकत नाही, का ते जाणून घेऊया.. (not just for pathaan movie but Shah Rukh Khan family celebrates all hindu festivals)

सध्या बॉलीवुड मध्ये 'बॉयकॉट'चे वारे जोरदार वाहू लागले आहेत. आमीर खानच्या चित्रपटाला याचा मोठा फटका बसला. आता शाहरुखचा बहुचर्चित 'पठाण' सिनेमाही बॉयकॉट करावा असा ट्रेंड वर येत आहे. शाहरुखने हिंदुत्वाचा अपमान केल्याचे पसरवले जात आहे. शिवाय आपल्या चित्रपटाला बॉयकॉटचा फटका बसून नये म्हणून तो मंदिरात गेला, असेही बोलले जात आहे. पण त्यात फारसे तथ्य नाही. कारण शाहरुख स्वतः मुसलमान असला तरी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माविषयी प्रचंड आस्था आणि आदर बागळतो.

त्याची पत्नी गौरी ही स्वतः हिंदू आहे तर त्याच्या मुलाचे नाव आर्यन खान ही देखील हिंदू धर्माशीच निगडीत आहे. शाहरुखने याआधीही अनेकदा मंदिरात जाऊन देवी देवतांचे दर्शन घेतले आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान दरवर्षी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आपल्या घरी गणपती बाप्पाचे आगमन करतो. अत्यंत पारंपरिक पद्धतीने हा उत्सव त्याच्या घरी केला जातो. अगदी मोदकांपासून ते विसर्जना पर्यंत सर्व थाटमाट असतो.

एवढेच नाही तर मुंबई मध्ये होणाऱ्या गोपाळकाला म्हणजे 'दहीहंडी' उत्सवातही तो आवर्जून सामील होतो. कित्येक हिंदुत्ववादी पक्षांच्या दहीहंडीला त्याने हजेरी लावली आहे. केवळ हजेरीच नाही तर तो स्वतः कपाळी टिळा लावून हंडी फोडतो. गणेशोत्सवात ज्यांच्याकडे आमंत्रण असेल तिथे आवर्जून तो भेट देतो.

अगदी हिंदू समाजात दिमाखात केला जाणारा दिवाळीचा सण ही शाहरुख आपल्या कुटुंबासोबत साजरी करतो. त्याचे मित्रपरिवार, निकटवर्तीय हिंदू समाजातील असल्याने त्याच्या मनात कोणत्याही धर्माविषयी तेढ नाही ते त्याने अनेकदा कृतीतून दाखवून दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Story: गटविकास अधिकाऱ्यांची एमपीएससीत यशस्वी झेप; सोनल शहांची जीएसटी असिस्टंट कमिशनरपदी निवड, नाेकरी करत यशाला गवसणी!

Asaduddin Owaisi : मुस्लिमांनी नेतृत्व निर्माण करावे

IND vs NZ 1st ODI : विराट कोहली प्रेक्षकांवर भडकला! Rohit Sharma बाद झाल्यावर जे घडलं, ते अपेक्षित नाही; त्याला कसला राग आला?

Prajakt Tanpure:सत्ताधाऱ्यांचे हिंदुत्व बेगडी: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे; पोलिस निरीक्षक पुजारी यांच्यावर कारवाई करा !

Dog Attack : फुरसुंगीत भटक्या श्वानाचा एकवीस जणांना चावा

SCROLL FOR NEXT