Parineeti Chopra Raghav Chaddha Photos:  Esakal
मनोरंजन

Don 3: शाहरुखच्या जागी रणवीर तर आता प्रियंकाची जागा घेतली 'या' अभिनेत्रीने!

Vaishali Patil

Actress In Don 3: बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक फरहान अख्तर याने त्याच्या आगामी 'डॉन 3' ची घोषणा केली आणि तेव्हापासून तो चर्चेत आला. या चित्रपटाच्या घोषणेनंतर डॉनची भुमिका शाहरुख नव्हे तर रणवीर सिंग साकारणार अशी चर्चा होऊ लागली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच त्याने या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला.

डॉन फ्रँचायझीमध्ये पुढील डॉन म्हणून रणवीर सिंग भुमिका साकारणार असल्याची पुष्टी झाली असली तरी अद्याप या चित्रपटात हिरोईन म्हणुन कोण दिसणार याबाबत काही माहिती समोर आलेली नव्हती.

चित्रपटात रोमाचं पात्र हे डॉन मधील सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक आहे. डॉनचा प्रत्येक चित्रपट या शिवाय अपूर्ण. पहिल्या डॉनमध्ये ही भुमिका झीनत अमानने साकारली होती. दुसऱ्यावेळी ही भूमिका प्रियांका चोप्राने उत्तमरित्या साकारली.

त्यामुळे आता डॉन 3 मध्ये कोणती अभिनेत्री दिसणार याबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यासाठी कियारा अडवाणीच्या नावाची चर्चा रंगली होती मात्र आता आणखी एका अभिनेत्रीचे नाव समोर आलेआहे.

आता रिपोर्ट्सनुसार कियाराची जागा क्रिती सेननने घेतली आहे. क्रितीचं नाव डॉन 3 साठी फायनल करण्यात आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, क्रिती सेनन फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंटच्या ऑफिसमधून बाहेर पडताना दिसली. कॅज्युअल प्रिंटेड स्काय-ब्लू स्वेटशर्टमध्ये क्रिती मस्त दिसत होती. यावेळी तिने पापाराझींना पोज दिली. त्यानंतर फरहान अख्तरच्या डॉन 3 क्रितीची निवड करण्यात झाली असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत.

क्रिती फरहान आणि रितेशसोबत स्पॉट होताच तिच डॉनची रोमा असेल असं बोललं जात आहे. असं झाल्यास क्रिती आणि रणवीर सिंग मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र दिसतील.

क्रिती सेननच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर क्रिती सेनन टायगर श्रॉफ स्टारर 'गणपथ', विशाल भारद्वाजचा 'चुरिया' आणि आनंद एल राय दिग्दर्शित चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर तिने काजोलसोबत तिच्या प्रोडक्शन व्हेंचर 'दो पत्ती'चे शूटिंग सुरू केले आहे. ती करीना कपूर आणि तब्बूसोबत 'द क्रू' या चित्रपटातही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT