not only political leaders but urfi javed slams bollywood celebrities also sakal
मनोरंजन

Urfi Javed: राजकीय नेत्यांनाच नाही तर या सेलिब्रिटींनाही उर्फीनं दिलाय दणका..

सध्या उर्फी जावेदवर भाजप आणि हिंदुत्ववादी नेत्यांकडून सडकून टीका होत आहे, पण उर्फीही सगळ्यांना पुरून उरत आहे.

सकाळ डिजिटल टीम

urfi javed: आपल्या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन अडचणीत सापडली आहे. कारण उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर न्युडिटी पसरवण्याचा आरोप त्यांनी उर्फीवर केला. या तक्रारीनंतर उर्फी चांगलीच भडकली आहे. उर्फीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चित्रा वाघ यांना आव्हानच दिलं आहे. दोघींमध्ये चांगलाच वाद सुरू आहे.

उर्फी जावेद आणि वाद यांचा जवळचा संबंध आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. उर्फी जावेदच्या चित्रविचित्र फॅशन स्टाइल बदल भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पोलिस तक्रार केली आहे. उर्फीला तिच्या फॅशन कोणी काय बोलले आणि उर्फीने पंगा घेतला नाही हे नवीन नाही या आधी देखील उर्फीने अनेक तिच्या इंडस्ट्रीतील लोकांकडून टीकेचा सामना करावा लागला आहे आणि वाद झाले आहेत.

सुधांशू पांडे - सुधांशू पांडेने उर्फी जावेदच्या चाहत्यांना दिलेल्या टॉपलेस दिवाळीच्या शुभेच्छांवर प्रतिक्रिया दिली आणि तिला फालतू म्हटले होते. उर्फीने नंतर त्याला प्रत्युत्तर दिले सरळ त्याच्या 'अनुपमा' शोवर निशाणा साधला. इंस्टाग्रामवर लिहिले, ''परिस्थिती काय आहे? अनुपमा हा महिला सक्षमीकरणाविषयीचा एक शो आहे, जिथे एक स्त्री समाजाने स्त्रियांसाठी ठरवून दिलेले सर्व 'नियम' मोडत आहे. सुधांशू, तू तुझाच शो का बघत नाहीस? तिथून तुम्ही काही शिकू शकता."

कश्मिरा शाहा - उर्फी जावेद फक्त इंस्टाग्रामवर प्रसिद्ध आहे असे कश्मिराने सांगितल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. उर्फीने नंतर उत्तर दिले, "मी खरंच याला संबोधित करणार नव्हते, परंतु मी कोणालाही बालिश म्हणू शकत नाही किंवा कोणाला धमकावणार नाही. आता काहीही झाले तरी ही माझी शेवटची पोस्ट असेल."

नंतर एका पापाराझीशी बोलताना उर्फीने सांगितले होते की, कश्मिरा ना इंस्टाग्रामवर प्रसिद्ध आहे ना खऱ्या जगात. उर्फी म्हणाली, "हो, ते माझ्याबद्दल काय म्हणाले ते मी वाचले आहे. तुम्ही जे काही विधान केले आहे, त्यात एक वैध मुद्दा लिहा." उर्फी म्हणते की, 'मी इंस्टाग्रामवर प्रसिद्ध आहे खऱ्या आयुष्यात नाही. पण तू कुठेच नाहीस, काय उपयोग?'

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

चाहत खन्ना

सेमी न्यूड दिसल्याबद्दल चाहत खन्ना यांनी उर्फीला फटकारले तेव्हा उर्फी म्हणाली, "मी खूप समाधानी आहे आणि चाहत जी, तुम्ही मला सांगा. तुमने दोनदा पत्नी झाला आहात तुम्ही काय साध्य केले?"चाहत खन्ना यांनी त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'सत्य जाणून न घेता केवळ प्रसिद्धीसाठी मध्यभागी उडी मारणे म्हणजे स्वत:ला मूर्ख बनवण्यासारखे आहे. मूर्खाशी वाद घालण्यात काय अर्थ आहे? मी तिथे असते तर मी काम केले असते किंवा शूट केले असते. फक्त सेमी न्यूड स्पॉटिंग नाही. चला काही हरकत नाही, तूम्ही काकू, पत्नी किंवा आई होण्यास योग्य नाही.  इतरांना आंटी म्हणवूनच आनंदी रहा. अल्लाह तुम्हाला बुद्धी देवो.'

फराह अली

फराह अली खानने उर्फीच्या ड्रेसिंग सेन्सला घृणास्पद म्हटल्यानंतर, उर्फीने फराहवर तिला लाजवल्याचा आरोप केला आणि तिचे स्विमसूटमधील फोटो देखील शेअर केले. फराहच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत उर्फीने लिहिले की, "तुला माझा बचाव करायचा नव्हता. तू एक प्रसिद्ध चेहरा आहेस आणि तू माझ्यावर अशी कमेंट केलीस की ती हेडलाइन बनली. तुझी कमेंट वाचून मला धक्का बसला. मी खूप रडले. तू मला सामाजिकरित्या लाजवलेस, पण मी स्वत:साठी उभे राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शैक्षणिक सहलींसाठी विद्यार्थ्यांसाठी सहलीत ५० टक्के सवलत; प्रत्येकास १० लाखांचा अपघात विमाही; एसटी महामंडळाचे आगारप्रमुख जाणार शाळांमध्ये

आजचे राशिभविष्य - 19 नोव्हेंबर 2025

Horoscope Prediction : आज तयार होतोय अमला राजयोग; मेष आणि या पाच राशींच्या आर्थिक अडचणींना लागणार पूर्णविराम !

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात रवा पिझ्झा बॉल ट्राय केले का? लगेच लिहून घ्या रेसिपी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT