not salman khan shah rukh khan other actors like ajay devgn akshay kumar kartik aaryan diwali eid 2024 release SAKAL
मनोरंजन

Salman - Shah Rukh Khan: २०२४ च्या ईद - दिवाळीत सलमान - शाहरुखचे नव्हे तर 'या' सुपरस्टारचे सिनेमे होणार रिलीज

दरवर्षी ईद - दिवाळीला सलमान - शाहरुख सिनेमे रिलीज करतात. पण या वर्षी तसं होणार नाही

Devendra Jadhav

Salman Khan - Shah Rukh Khan News: आपल्या सर्वांना हे माहितच आहे की, सलमान खान आणि शाहरुख खान हे त्यांच्या सिनेमांच्या रिलीज डेट बाबतीत कायम सतर्क असतात.

२०२३ मध्ये सलमानने दिवाळीत 'टायगर 3' रिलीज केला होता. तर शाहरुखने सुद्धा ख्रिसमस आणि सणासुदीचं औचित्य साधून 'पठाण', 'जवान', 'डंकी' रिलीज केले होते. हे दोन्ही खान ईद - दिवाळीच्या दिवशी प्रत्येक वर्षी त्यांचे बिग बजेट सिनेमे रिलीज करत असतात. पण यंदा २०२४ मध्ये असं होणार नाही.

सलमान - शाहरुखचा 2024 मध्ये एकही रिलीज नाही

गेल्या वर्षी, सलमान खानने दिवाळीला त्याचा ‘टायगर ३’ आणि ईदला ‘किसी का भाई किसी की जान’ हे चित्रपट प्रदर्शित केले होते. तर शाहरुखने प्रजासत्ताक दिनी ‘पठाण’ आणि ख्रिसमसच्या दिवशी ‘डंकी’ हे दोन चित्रपट रिलीज केले होते. मात्र यंदा सलमान - शाहरुख खान दोघेही ईद आणि दिवाळीच्या तारखा वगळणार आहेत.

दोन्ही खान यावर्षी आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असणार आहेत. सलमान खान लवकरच 'शेरशाह' फेम विष्णू वर्धन दिग्दर्शित 'द बुल'साठी काम करण्यास सुरुवात करेल. आणि शाहरुख मार्च किंवा एप्रिलमध्ये त्याच्या शीर्षक नसलेल्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरूवात करेल. यामुळे या वर्षी २०२४ मध्ये या दोघांचे कोणतेही सिनेमे रिलीज होणार नाहीत.

नवीन वर्षात ईद - दिवाळीवर या कलाकारांचं वर्चस्व

सलमान - शाहरुखचे कोणतेही सिनेमे रिलीज नसताना यावर्षी ईद - दिवाळीत अक्षय कुमार, अजय देवगण आणि इतर कलाकार त्यांचे चित्रपट प्रदर्शित करणार आहेत.

यंदाच्या ईदवर अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट येणार आहे. हा चित्रपट 2024 मध्ये ईदला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

याशिवाय कार्तिक आर्यन आणि कबीर खान एका खेळाडूची जीवन कथा सर्वांसमोर आणणार आहेत. या सिनेमाचं नाव 'चंदू चॅम्पियन'. हा चित्रपट 2024 च्या ईदच्या मुहूर्तावर 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

दुसरीकडे, अजय देवगण त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिंघम अगेन' १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित करणार आहे. याशिवाय कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' 2024 मध्ये दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. लाँग वीकेंड असल्याने या दिवाळीत अनेक चित्रपटांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Sushil Kediya : मराठीत विचारताच चर्चेतून पळ काढला, ३० वर्षांपासून मुंबईत करतोय काय? कोण आहे सुशील केडिया?

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

SCROLL FOR NEXT