Noted Iranian film director and his wife found stabbed to death in their home Esakal
मनोरंजन

Dariush Mehrjui: धक्कादायक! इराणमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि त्यांच्या पत्नीची हत्या

Vaishali Patil

Noted Iranian film director and his wife found stabbed to death in their home: प्रसिद्ध इराणी चित्रपट दिग्दर्शक दारियुश मेहरजुई आणि त्यांच्या पत्नीची अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

सरकारी वृत्तसंस्था इस्लामिक रिपब्लिक न्यूज एजन्सी (IRNA)चे अधिकारी हुसेन फैझेली यांनी याबाबत माहिती दिली आहे. दारियुश मेहरजुई आणि त्यांची पत्नी वहिदेह मोहम्मदीफर हे त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आले. दोघांच्या मानेवर चाकूच्या खुणा आढळून आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.

फाझेलीने दिलेल्या वृत्तानुसार, दिग्दर्शकाची मुलगी मोना मेहरजुई शनिवारी रात्री तिच्या वडिलांच्या घरी गेली होती, जिथे तिला दारियुश मेहरजुई आणि त्याची पत्नी दोघेही मृतदेह आढळले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोघांच्या हत्येमागील कारणाचा तपास पोलीस घेत आहेत. याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

काही आठवड्यांपूर्वी दिग्दर्शकाला चाकूने हल्ला करण्याची धमकी मिळाली होती. याबाबत दारियुशने त्याच्या सोशल मीडियावर तक्रारही केली होती. 1970 च्या दशकाच्या सुरुवातीस दारियुश मेहरजुई यांना वास्तववादावर आधारित इराणी चित्रपटाच्या 'न्यू वेव्ह' चळवळीचे सह-संस्थापक ओळखले जात होते.

दारियुश मेहरजुई यांनी 1998 मध्ये शिकागो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सिल्व्हर ह्यूगो' आणि 1993 मध्ये सॅन सेबॅस्टियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'गोल्डन सीशेल' पुरस्कारासह अनेक पुरस्कार देण्यात आले. त्याच्या मृत्यूनंतर सध्या मनोरंजन विश्वात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस आता या प्रकणाचा तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking Crime Incident : शेजाऱ्याचे आईसोबत संबंध, नंतर मुलीसोबत अतिप्रसंगाचा प्रयत्न; पण तरुणीने जे केलं ते भयानक...

MOVIE REVIEW: पटापट दाखवण्याच्या नादात हरवलं भावनांचं कनेक्शन; 'क्रांतीज्योती विद्यालय'चे सचिन खेडेकर एकमेव तारणहार

Latest Marathi News Live Update : नांदेड महापालिकेत भाजप-आरपीआयची युती तुटली

Jaysingpur Election : अधिकारी निवडणूक ड्युटीवर, जयसिंगपूर पालिकेचा कारभार मात्र रामभरोसे

Success Story: सैनिकी परंपरेला नवे पंख! सुभेदाराची मुलगी फ्लाइंग ऑफिसर बनून वायुसेनेत दाखल, वाचा श्रेजलची कहाणी

SCROLL FOR NEXT