Nushrratt Bharuccha back to India Israel Hamas  esakal
मनोरंजन

Nusrat Bharucha : अखेर अभिनेत्री नुसरत भरुचा मुंबईत पोहचली! चाहत्यांना मोठा दिलासा

यासगळ्यात बॉलीवूडची अभिनेत्री ही इस्त्राईलमध्ये अडकून पडल्याची माहिती समोर आली होती.

युगंधर ताजणे

Nushrratt Bharuccha back to India Israel Hamas : इस्त्राईलमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलेली बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचा ही अखेर भारतात परतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काही तासांपूर्वी नुसरत बाबत वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या होत्या.

शनिवारी हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्राईलवर हल्ला केला होता. त्यात मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचे दिसून आले होते. या घटनेनं साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना सुरुवातही झाली होती. त्यात इस्त्राईलचे सरकार पूर्णपणे हादरुन गेल्याचे दिसून आले. अनेक देशांनी त्यांना आपला पाठींबाही दर्शवला होता.

यासगळ्यात बॉलीवूडची अभिनेत्री ही इस्त्राईलमध्ये अडकून पडल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे भारतातील तिच्या चाहत्यांना आणि कुटूंबियांना तिच्याविषयी मोठी काळजी वाटू लागली होती. काही तासांपूर्वी अभिनेत्रीच्या कुटूंबियांनी ती सुखरुप असून दुबईमार्गे मुंबईत येणार असल्याचे सांगितले होते.

एएनआयनं केलेल्या ट्विटनुसार काही वेळेपूर्वी नुसरत ही मुंबईच्या विमानतळावर आल्याचे सांगण्यात आले आहे.यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेतान्याहू यांनी थेट युद्धाची घोषणा केली आहे. गाझा पट्टीतील ‘हमास’ या दहशतवादी गटानं जो हल्ला केला त्यात शंभराहून अधिक जण ठार झाले आहेत. यात इस्त्राईलनं देखील हमासला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

काही तासांपूर्वी मिळालेल्या माहितीनुसार, नुसरतच्या टीममधील संचिता त्रिवेदी यांनी म्हटले होते की, नुसरतशी संपर्क झाला असून ती काही वेळानंतर भारतात येणार आहे. त्यानंतर तिचे भारतात आगमन झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT