मनोरंजन

सेटवर अचानक कोसळली नुशरत भरुचा; रुग्णालयात केलं दाखल

शूटिंग सुरु असताना ती अचानक सेटवर कोसळली.

स्वाती वेमूल

बॉलिवूड अभिनेत्री नुशरत भरुचाची Nushrratt Bharuccha शूटिंगदरम्यान तब्येत बिघडली. गेल्या काही दिवसांपासून ती आजारी होती. मात्र शूटिंगसाठी तारखा दिल्यामुळे ती कामावर आली होती. शूटिंग सुरु असताना ती अचानक सेटवर कोसळली. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 'लव रंजन' या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. नुशरतची प्रकृती बिघडल्याने चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. नुशरतला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत नुशरतने तिच्या तब्येतीविषयी माहिती दिली. "जास्त तणावामुळे मला व्हर्टिगो अटॅग आला, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त मी सेटजवळील एका हॉटेलमध्ये राहत होते. घरून सेटपर्यंतचा प्रवास लांब पडत होता, म्हणून हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. जवळपास तीन आठवड्यांच्या शूटिंगनंतर मला थकवा जाणवू लागला. एक दिवस आराम करून बरं वाटेल असं मला वाटलं. मात्र पुन्हा दुसऱ्या दिवशी माझी तब्येत बिघडली. शूटिंगदरम्यान मी सेटवर अचानक कोसळली. मला तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी माझा रक्तदाब खूप कमी झाला होता."

सध्या नुशरतची प्रकृती स्थिर असून तिला पुढील काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. नुशरतने 'प्यार का पंचनामा', 'सोनू के टिटू की स्विटी' यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT