nysa devgn Sakal
मनोरंजन

Nysa Devgn: 'ही सतत कुठे ना कुठे धडपडत असते', निसा देवगणचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेता अजय देवगण आणि काजोलची लाडकी लेक निसा देवगण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

Aishwarya Musale

बॉलीवूडचे प्रसिद्ध स्टार कपल अजय देवगण आणि काजोलची मुलगी नीसा सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. नीसा अद्याप कोणत्याही बॉलीवूड चित्रपटाचा भाग नसली तरी तिने ग्लॅमरच्या दुनियेत स्वत:चे नाव कमावले आहे. अजयच्या लाडक्या मुलीचा ग्लॅमर लुक आणि स्टाइल तिला नेहमी इतरांपेक्षा वेगळी बनवते.

नीसा देवगन अनेकदा तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी करताना दिसते. वीकेंड म्हणजे स्टार मुलांसाठी पार्टीचा दिवस. अशा परिस्थितीत रविवारी संध्याकाळी पुन्हा एकदा नीसा तिच्या मैत्रिणींसोबत पार्टीसाठी आली.

यादरम्यान इंटरनेटवर एक व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, यावेळी नीसाचा ग्लॅमरस लूक नसून यामध्ये ती कारचा दरवाजा उघडून बाहेर पडताना दिसतेय. मात्र अचानक ती उडी मारते आणि समोर असलेल्या सुरक्षारक्षकाला तिचा हलका धक्का लागतो.

खरं तर, नीसाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की नीसा कारचा दरवाजा उघडून बाहेर पडताना दिसतेय. मात्र अचानक ती उडी मारते. ती लगेच स्वत:ला सांभाळते आणि पडण्यापासून वाचते. या दरम्यान, तिच्या चेहऱ्यावर एक समाधानकारक हास्य आहे की ती इतक्या पापाराझींसमोर पडली नाही. पण या व्हिडीओमध्ये काही वेगळेच पाहायला मिळाले. नीसा तिच्या कारचा दरवाजा उघडताच तिचा अंगरक्षक तिच्या दिशेने सरकला.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सचे म्हणणे आहे की, नीसाने बॉडीगार्डला धक्का दिला. दुसरीकडे, काही युजर्सचे म्हणणे आहे की, ‘नक्कीच या मुलीमध्ये काहीतरी गडबड आहे’, असे एकाने लिहिले. तर ‘ही सतत नशेतच असते का’, असे दुसऱ्या युजरने लिहिले. ‘निसा सतत कुठे ना कुठे धडपडत असते’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

त्याचवेळी नीसाचा जवळचा मित्र ओरीही गाडीतून खाली उतरताना दिसला. नीसा रोज ओरीसोबत पार्टी करताना दिसते. या दोघांची मैत्री सध्या बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये चर्चेत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

World Cup 2025: 'आता विजयाची सवय लावायची...' वर्ल्ड कप विजयानंतर काय म्हणाली कॅप्टन हरमनप्रीत कौर?

SCROLL FOR NEXT