Akshay Kumar Post Oh My Gadar Akshay Kumar thanks audiences for ‘greatest week’ in film history OMG 2 connect with Gadar 2  Esakal
मनोरंजन

Akshay Kumar Post: ओह माय गदर! OMG2 च्या कमाईनं अक्षय खुश! गदर2चं ही केलं प्रमोशन

Vaishali Patil

Akshay Kumar Post: बॉलिवूडमध्ये सध्या दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घालत आहेत. यात एक आहे अक्षय कुमार चा OMG 2 आणि दुसरा आहे सनी देओलचा गदर 2. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अक्षय कुमारच्या OMG 2 या चित्रपटाचे सर्वजण कौतुक करत आहेत. या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहेत. आता सहा दिवसांत OMG 2 या चित्रपटाने 50 कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून आता सिनेमा 100 कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल करत आहे.

गदर 2 आणि OMG 2 या दोन्ही चित्रपटात स्पर्धा लागली असली तरी यात सनी देओलच्या गदर 2 ने चांगली कमाई करत OMG 2 ला मागे टाकले आहे. आता या सिनेमाला मिळणारी लोकप्रियता पाहून अखेर अक्षय कुमारने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर OMG 2 चा एक व्हिडिओ शेयर केला आहे. यात अक्षय गदर चित्रपचं सुपरहिट गाणं 'उड जा काले कावा हे' म्हणतोय. खर तरं OMG चित्रपटातही त्याने हे गाणं म्हटलं आहे.

आता हाच व्हिडिओ शेयर करत त्याने लिहिलं की, 'ओह माय गदर'वर एवढ्या प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आणि भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वोत्तम आठवडा दिल्याबद्दल प्रेक्षकांचं खूप खूप आभार. प्रेम आणि कृतज्ञता.' यात अक्षयने OMG 2 आणि गदर 2 या चित्रपटांचे प्रमोशनही केले आहे. दोन्ही चित्रपट थिएटरमध्ये दाखल असून ते पाहण्याचे आवाहन केले आहे.

OMG 2 ने पहिल्या दिवशी 10.26 कोटींची कमाई करत चांगली ओपनिंग केली होती. त्यानंतर 15 ऑगस्टला या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. रिपोर्टनुसार, चित्रपटाने सहाव्या दिवशी म्हणजे बुधवारी 7.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच आता चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 80.02 कोटी रुपये झाले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT