Om Raut shared new poster of Adipurush Prabhas and Kriti Sanon starrer
Om Raut shared new poster of Adipurush Prabhas and Kriti Sanon starrer sakal
मनोरंजन

Adipurush: जय श्री राम.. म्हणत ओम राऊतनं शेयर केलं 'आदिपुरुष'चं नवं पोस्टर आणि रिलीज डेट..

नीलेश अडसूळ

Adipurush director om raut: 'तान्हाजी' चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) हा सध्या त्याच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची सर्वजन आतुरतेने वाट पाहत होते. परंतु या चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आणि एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले.

चित्रपटात वापरण्यात आलेले VFX आणि रावणाची भूमिका यावरून या चित्रपटाला खूप ट्रोल केलं गेलं. पण आज रामनवमी निमित्त ओम राऊत यांन पुन्हा एकदा 'आदिपुरुष' चित्रपटाचे नवे आणि खास पोस्टर शेयर केले आहे.

(Om Raut shared new poster of Adipurush Prabhas and Kriti Sanon starrer)

आजपर्यंत आपण पोस्टर मधून केवळ राम अवतरातील अभिनेता प्रभासचा लुक पाहिला होता. पण यंदा शेयर करण्यात आलेल्या पोस्टर मध्ये राम , सीता, लक्ष्मण आणि हनुमंत या चौघांचे दर्शन घडते.

या पोस्टर मध्ये अभिनेत्री कृती सनन सीतामातेच्या रूपात आणि मराठी अभिनेता देवदत्त नागे हनुमनाच्या रूपात पाहायला मिळत आहे.

यावेळी पोस्टर शेयर करताना ओम राऊतने (om raut) फोटो सोबत एक खास कॅप्शनही दिले आहे. ''मंत्रों से बढ़के तेरा नाम.. जय श्री राम'' असे ओम म्हणाला आहे.

ओम राऊत दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. हे पोस्टर आल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असेल असे वाटले होते. पण तसे फारसे दिसले नाही. काहींनी ओम राऊतचे कौतुक केले.

पण काहींनी मात्र 'अजूनही सुधारणा झाली नाही', 'हा आमचा राम वाटत नाही', 'कृती सीता वाटते का', 'तुम्हीही कितीही काही केलं तरी जुन्या रामायण मालिकेची जागा घेऊ शकत नाही' अशा काहीशा टीका करणाऱ्या कमेंटही केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: भारतातील न्यायालये लोकशाहीच्या चर्चेचे ठिकाण; ब्राझीलमधील J20 परिषदेत डी वाय चंद्रचूड यांचे स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update: जागृतीनगर ते घाटकोपर दरम्यान सुरु असलेली मेट्रो संध्याकाळी 6 वाजल्यापासून बंद राहणार

Vastu Tips: नवीन हॉटेल सुरू करताना कोणते नियम पाळावे, वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Bank Fraud: कोण आहे धीरज वाधवान? ज्याने विजय मल्ल्या अन् नीरव मोदीपेक्षाही केलाय मोठा स्कॅम

Amit Shah: POK भारताचे आहे अन् आम्ही ते परत घेऊ; अमित शाह यांचा इशारा

SCROLL FOR NEXT