OMG 2 Box Office Collection day 5 esakal
मनोरंजन

OMG 2 Box Office Collection Day 5: गदर2 ला चांगलाच नडतोय OMG 2 ! रिलिजच्या पाचव्या दिवशी केली बक्कळ कमाई...

Vaishali Patil

OMG 2 Vs Gadar 2 Box Office Collection : बॉलिवूड आणि वाद हे गेल्या काही दिवसांपासून समिकरणचं झालं आहे. अनेक चित्रपटांच्या रिलिजनंतर वाद झाले मात्र त्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई देखील केली. असचं काहीसं अक्षय कुमार याच्या OMG2 सोबत घडलयं.

अक्षयच्या या चित्रपटावर अनेकांनी आक्षेप घेतला. त्याने महादेवाचा अपमान केला आहे. धार्मिक भावना दुखावल्या आहेत असे अनेक आरोप अक्षय आणि चित्रपटाच्या निर्मात्यावर झाले आहेत.

वाद एका बाजूला मात्र चित्रपटात एक लैंगिक शिक्षणाबद्दल जनजागृती करण्यात आली आहे. महत्वाच्या मुद्यावर मनोरंजनपणे भाष्य करणारा हा सिनेमा आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा या सिनेमाला प्रतिसाद देखील चांगला मिळत आहे.

सनी देओलचा सुपरहिट गदर सिनेमाचा सिक्वेल गदर 2 ला अक्षय कुमारचा OMG2 चांगलीच टक्कर देत आहे. OMG 2 त्याच्या कलेक्शनमध्ये सातत्याने वाढ होत आहे. स्वातंत्र्यदिनाचा आणि लाँग विकेंडचा फायदा देखील या चित्रपटाला मिळाला आहे. आता OMG चे तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे.(Latest Marathi News)

'OMG 2' पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी या चित्रपटाने 10 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्याच वेळी, चित्रपटाने 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर सगळ्या जास्त कमाई केली आहे.

SacNilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'OMG 2' ने स्वातंत्र्यदिनी म्हणजेच रिलीजच्या 5 व्या दिवशी 18.50 कोटी कमावले आहेत. 5 व्या दिवसाच्या कमाईच्या आकड्यासह या चित्रपटाची एकूण कमाई आता 73.67 कोटी इतकी झाली आहे.

आता लवकरच अक्षय कुमारचा हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामिल होईल यात काही शंकाच नाही.

अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी आणि यामी गौतमी यांचा OMG 2 हा एक गंभीर विषयावर बोलणारा चित्रपट आहे. OMG 2 ला प्रेक्षक आणि समिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT