OMG 2 faced 0 cuts but went through 27 modifications akshay kumar pankaj tripathi yami gautam released on 11 august SAKAL
मनोरंजन

अखेर OMG 2 च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, २७ बदलांसह सिनेमा या तारखेला रिलीज होणार, लवकरच ट्रेलर भेटीला

OMG 2 सिनेमाच्या रिलीजचा मार्ग मोकळा झालाय. लवकरच येणार सिनेमाचा ट्रेलर

Devendra Jadhav

OMG 2 Release Soon: अक्षय कुमारचा आगामी OMG 2 सिनेमाबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात आणि सेन्सॉरच्या कचाट्यात अडकला होता. सिनेमाचा वाद अगदी कोर्टापर्यंत गेला.

OMG 2 सिनेमा रखडणार असुन त्याचं रिलीज थांबणार, अशा अनेक चर्चा सुरु होत्या. पण आता OMG 2 च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाल्याची बातमी समोर आलीय. त्यामुळे अक्षयच्या फॅन्सना आनंद झालाय.

(OMG 2 faced 0 cuts but went through 27 modifications)

सिनेमात कोणताही कट नाही पण...

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे की, सेन्सॉरशिपच्या मुद्द्यांमुळे चित्रपटात अनेक कट केले जाणार आहेत. परंतु मिडीया वृत्तानुसार, चित्रपटात कोणताही कट होणार नाही.

OMG 2 कोणताही कट न करता पास झाला आहे. चित्रपटात काही दृश्ये, संवाद आणि पात्रे आहेत, जी सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांशी चर्चा केल्यानंतर निर्मात्यांनी त्या दृश्यांमध्ये बदल केला आहे.

OMG 2 सिनेमाला A सर्टिफिकेट

खरं तर, OMG 2 गेल्या काही आठवड्यांपासून CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) च्या समस्यांमुळे चित्रपट चर्चेत आहे. अखेर अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अखेर या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले आहे.

अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम अभिनीत अमित राय दिग्दर्शित चित्रपटाला 2 तास 36 मिनिटांच्या रनटाइमसह 'ए - फक्त प्रौढांसाठी' प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

OMG 2 आणि CBFC च्या टीमचे गेल्या 2 आठवड्यांपासून मतभेद सुरु होते. शेवटी क्रिएटिव्ह टीमने विजय मिळवला आहे. OMG 2 आता 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाल्यावर आता OMG 2 चित्रपटाचे प्रमोशन आता सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय येत्या दोन दिवसांत या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे.

का झाला होता वाद?

OMG 2 चा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला, ज्याला चाहत्यांनी पसंती दिली आहे. मात्र टीझरमध्ये रेल्वे ट्रॅकच्या कडेला पाण्याने शिवाला अभिषेक केला जात आहे, या सीनवर युजर्सनी प्रचंड गोंधळ घातला होता. याशिवाय इतर अनेक कारणांमुळे या चित्रपटाच्या अनेक दृश्यांवर सेन्सॉर बोर्ड कात्री लावणार असल्याचे बोलले जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकबराच्या बापाचा बाप, बापाचा बाप, बापाचा बापही पैदा झाला नव्हता तेव्हा...; कुंभमेळ्यावरून फडणवीस गरजले

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात येतोय शेतात राबणारा काळ्या आईचा पुत्र

माेठी बातमी! शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा ‘व्हायरल; उत्तर सोलापूर, सांगोला वगळून माढा, माळशिरसमधून जाणार !

Latest Marathi News Live Update : पिंपळनेरकडे येणाऱ्या अवैध मद्यवाहतुकीवर उत्पादन शुल्कची धडक; ७१.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त

भाजपकडून पैशांच्या पाकिटांचं वाटप, शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडलं; VIDEO आला समोर

SCROLL FOR NEXT