OMG 2 Leaked story Revolving Around A Gay Guy Dying By Suicide importance of sex education  SAKAL
मनोरंजन

OMG 2 Story Leak: या गंभीर समस्येसाठी भगवान शंकर अवतरणार, OMG 2 कथा झाली उघड

OMG 2 मध्ये अक्षय भगवान शंकराच्या भुमिकेत दिसणार आहे

Devendra Jadhav

OMG 2 Story Plot Leaked: सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. सिनेमाचा टीझर काहीच दिवसांपुर्वी रिलीझ झाला. सिनेमाचा टीझर प्रेक्षकांना आवडला. OMG मध्ये अक्षय कुमार श्रीकृष्णाच्या भुमिकेत दिसला.

आता OMG 2 मध्ये अक्षय भगवान शंकराच्या भुमिकेत दिसणार आहे. पंकज त्रिपाठी सिनेमात सामान्य माणसाची भुमिका साकारत आहेत.

OMG मध्ये नास्तिक असलेल्या कानजीभाईला श्रीकृष्ण मदत करतात. आता भगवान शंकर अवतार का घेणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता. OMG 2 ची कथा लीक झालीय.

(OMG 2 Leaked story Revolving Around A Gay Guy Dying By Suicide importance of sex education)

काय असणार सिनेमाची कथा?

आता काही मिडीया रिपोर्ट्समध्ये चित्रपटाची कथा होमोफोबियावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. भारतीय शाळांमध्ये लैंगिक शिक्षण अनिवार्य करण्याभोवती ही कथा फिरणार आहे. होमोफोबिया ही एक प्रकारची भीती आहे, जी समलैंगिक लोकांमध्ये दिसते

या चित्रपटाचे कथानक रेडिट अकाउंटवर लीक झाले आहे. साइटवर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चित्रपटाची कथा एका समलिंगी मुलाभोवती फिरते ज्याला महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून मारहाण केली जाते.

शेवटी तो मुलगा आत्महत्या करतो. या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, या घटनेने व्यथित झालेले कॉलेजचे प्राध्यापक (पंकज त्रिपाठी) कॉलेजमध्ये लैंगिक शिक्षण सक्तीचे करण्याचा प्रयत्न करतात.

जेणेकरून विद्यार्थ्यांना माहिती मिळेल आणि त्यामुळे दादागिरीही कमी होईल. धार्मिक लोक याचा विरोध करतात आणि ते ही संकल्पना देवाच्या निर्मितीच्या विरुद्ध मानतात. आणि मग या कथेत भगवान शिव (अक्षय कुमार) प्राध्यापकाला मदत करण्यासाठी येतात.

OMG 2 चित्रपटात पंकज त्रिपाठी शिवभक्त प्राध्यापकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर यामी गौतम एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. तुम्ही सर्वांनी अक्षय कुमारला शिवशंकराच्या भुमिकेत आहे हे सर्वांना माहीतच आहे.

OMG 2 सिनेमा रखडला?

OMG 2 या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सेन्सॉर बोर्डाने त्यावर आक्षेप घेतल्याचे कळतंय. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांना CBFC सोबत अडचणी येत आहेत.

निर्मात्यांना हा सिनेमा Review समितीकडे नेण्यास सांगितला आहे. तथापि, 'OMG 2' च्या निर्मात्यांना अद्याप CBFC कडून कोणतीही सूचना मिळालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT