omg 2 trailer akshay kumar pankaj tripathi yami gautam release at 11 august SAKAL
मनोरंजन

OMG 2 Trailer: भक्ताचा अंधकार दूर करायला अवतरले शंकर.. ओह माय गॉड 2 चा जबरदस्त ट्रेलर

OMG 2 चा जबरदस्त ट्रेलर रिलीज झालाय

Devendra Jadhav

OMG 2 Trailer News: ओह माय गॉड 2 सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. आता या सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झालाय. गेल्या अनेक दिवसांपासुन सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता होती. अखेर हा ट्रेलर रिलीज झालाय.

भक्ताच्या आयुष्यातला अंधकार दूर करायला भगवान शंकर अवतार घेणार, अशी या सिनेमाची रंजक कथा आहे

(omg 2 trailer akshay kumar pankaj tripathi yami gautam release at 11 august)

काय आहे ट्रेलरमध्ये?

OMG 2 च्या ट्रेलरमध्ये पहायला मिळतं की, नंदी शिवशंकराला त्याच्या भक्तावर संकट आलंय हे सांगतोय. पुढे मग पंकज त्रिपाठींचं सर्वसामान्य माणसाचं कुटुंब दिसतं. या कुटुंबावर एक संकट ओढवतं. पंकज त्रिपाठी थेट कोर्टात केस दाखल करतात.

पुढे पंकज त्रिपाठींच्या मदतीला भगवान शंकर अवतरतात. शंकराच्या भुमिकेत अक्षय कुमार दिसतो. पुढे पंकज त्रिपाठींची मदत अक्षय कुमार कसा करतो, याची कहाणी म्हणजे OMG 2

OMG 2 सिनेमाला A सर्टिफिकेट

खरं तर, OMG 2 गेल्या काही आठवड्यांपासून CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) च्या समस्यांमुळे चित्रपट चर्चेत आहे. अखेर अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अखेर या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले आहे.

अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम अभिनीत अमित राय दिग्दर्शित चित्रपटाला 2 तास 36 मिनिटांच्या रनटाइमसह 'ए - फक्त प्रौढांसाठी' प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

सिनेमात कोणताही कट नाही पण...

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे की, सेन्सॉरशिपच्या मुद्द्यांमुळे चित्रपटात अनेक कट केले जाणार आहेत. परंतु मिडीया वृत्तानुसार, चित्रपटात कोणताही कट होणार नाही.

OMG 2 कोणताही कट न करता पास झाला आहे. चित्रपटात काही दृश्ये, संवाद आणि पात्रे आहेत, जी सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांशी चर्चा केल्यानंतर निर्मात्यांनी त्या दृश्यांमध्ये बदल केला आहे. OMG 2 ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT