Anvita and Shalv 
मनोरंजन

'तू मी आणि पुरणपोळी'; खास अंदाजात पाहायला मिळणार ओम-स्वीटूची लव्हस्टोरी

यात नेमकं काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

स्वाती वेमूल

सुखाचं-हक्काचं माहेर सोडून मुलगी एका वेगळ्याच कुटुंबात प्रवेश करते. असं घर जे इथून पुढे तिचं होणार असतं. या प्रवासात तिला पतीची साथ असली तरी एका जिवाभावाच्या मैत्रिणीची तिला कायमच उणीव भासत असते. अशावेळी सासूच जर तिची सखी झाली तर नात्यांचा गोडवा अधिकच वाढतो आणि घराचं गोकुळ होतं. अशाच एका गोड नात्याची कथा सांगणारी 'येऊ कशी तशी मी नांदायला' Yeu Kashi Tashi Mi Nandayla ही मालिका झी मराठीवर Zee Marathi serial आली आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. आता या मालिकेचा एक अनोखा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'तू मी आणि पुरणपोळी' हा विशेष भाग येत्या १६ मे रोजी प्रसारित होणार आहे. (omkar sweetu love story to be shown in a unique way in yeu kashi tashi mi nandayla)

या मालिकेला आणि त्यातील नलू मावशी, दादा, चिन्या, शकू मावशी, मालविका, रॉकी या पात्रांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर या नवीन जोडीने तरुणाईवर छाप सोडली आहे. प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्यासोबत सावलीसारखा उभा राहणारा ओम या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. ओम आणि स्वीटूच्या मैत्रीचं हळूहळू प्रेमात रूपांतर होताना दिसत आहे.

आता याचाच पुढचा टप्पा 'तू मी आणि पुरणपोळी' हा १६ मे रोजी संध्याकाळी ७ वाजता चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. आता या चित्रपटात नेमकं काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

Pimpri Raja Accident: पिंप्री राजा गणेश मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, सात जखमी, गावावर शोककळा

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

SCROLL FOR NEXT