मनोरंजन

करण जोहर, सनी लियोनी, चेतन भगत One Mic Stand मध्ये...

युगंधर ताजणे

अमेझॉन प्राईम व्हिडीओच्या आगामी ओरिजिनल 'वन माईक स्टँड सीझन 2'च्या ट्रेलरचे आज अनावरण करण्यात आले आहे. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता सनी लिओन, लेखक चेतन भगत, पत्रकार फेय डिसूझा आणि गायक-रॅपर रफ्तार यांसारखे लोकप्रिय सेलिब्रिटी स्टँड अप कॉमेडीमध्ये सहभागी होणार आहे. या सीरीजचे प्रीमियर 22 ऑक्टोबरला 240 देशांमध्ये होणार आहे. प्राईम व्हिडीओच्या 2021च्या फेस्टिव लाइन-अपचा तो एक भाग असेल. सुप्रसिद्ध कॉमेडियन सपन वर्मा यांनी होस्ट केलेले, वन माइक स्टँड हा एक मनोरंजक आणि अनोखा शो आहे जिथे विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी प्रथमच स्टँड-अप कॉमेडी सादर करणार आहेत.

प्रत्येक सेलिब्रिटीला एक स्टँड-अप कॉमेडियन नियुक्त केला जातो जो त्यांना स्टँडअप करण्यासाठी मार्गदर्शन करतो. या सीजनमध्ये अबीश मॅथ्यू, अतुल खत्री, समय रैना, सुमुखी सुरेश आणि पलटासारखे प्रतिभावान विनोदी कलाकार असून अनुक्रमे चेतन भगत, फेय डिसूझा, रफ्तार, करण जोहर आणि सनी लिओनी यांना मार्गदर्शन करणार आहेत. वन माइक स्टँड सीजन 2 चे क्रिएटर आणि होस्ट सपन वर्मा म्हणतात की, "पहिल्या सीजनला मिळालेला दर्शकांच्या जबरदस्त प्रतिक्रियांनी आम्हाला आगामी सीजनला अधिक मोठा आणि अधिक चांगला बनवण्यासाठी प्रोत्साहित केले. दुसरा सीजन पहिल्यांदाच कॉमेडीमध्ये हात आजमावणाऱ्या प्रतिभाशाली सेलेब्रिटीजसाठी एक वैविध्यपूर्ण रेंज सादर करत आहे.

यापूर्वी या कार्यक्रमामध्ये आपापल्या क्षेत्रात कर्तबगारी करताना चाहत्यांनी पाहिलं आहे. मात्र या शोमध्ये त्यांची अगदीच वेगळी बाजू आपल्यासमोर येणार आहे. या सीझनमध्ये देखील देशातील सर्वात मोठे आणि अनुभवी कॉमेडिअन्स असणार आहेत. जो या सेलेब्रिटीजचे मेंटर्स म्हणून काम करणार आहेत. आपल्या या शोच्या 22 ऑक्टोबरला होणाऱ्या ग्लोबल प्रीमियर ची आतुरतेने वाट पाहतो आहे. असेही वर्मा यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT