One Piece Egghead Arc eSakal
मनोरंजन

One Piece Egghead Arc : एका पर्वाचा अंत! 'वन पीस'मधील वानो आर्कचा अखेर शेवट; पुढच्या एग-हेड आर्कचा टीजर समोर

One Piece Wano Arc : या आर्कमध्ये लुफी आपल्या स्ट्रॉ-हॅट पायरेट क्रूसोबत चक्क दोन एम्पेरर्सना हरवतो.

Sudesh

One Piece New Arc : 'वन पीस' या जगातील सर्वात लोकप्रिय अ‍ॅनिमे सीरीजमधील एक मोठा टप्पा पूर्ण झाला आहे. आज (26 नोव्हेंबर) या अ‍ॅनिमे सीरीजमधील वानो आर्कचा शेवटचा एपिसोड प्रसिद्ध झाला. सुमारे चार वर्षांपूर्वी या आर्कची सुरूवात झाली होती. त्यामुळे एका मोठ्या पर्वाचा शेवट झाला असल्याची प्रतिक्रिया अ‍ॅनिमे फॅन्स देत आहेत.

या आर्कमध्ये लुफी (Luffy) आपल्या स्ट्रॉ-हॅट पायरेट क्रूसोबत चक्क दोन एम्पेरर्सना हरवतो. काईडो आणि बिग मॉम या दोघांना हरवण्यासाठी तो लॉ आणि किड या पायरेट्ससोबत युती करतो. वानो हा देश काईडोच्या ताब्यातून मुक्त करणे हे लुफीचं मुख्य उद्देश्य असतं. (Wano Arc Length)

काईडोला हरवण्यासाठी लुफी गिअर-5 चा वापर करतो. गिअर-5मध्ये लुफी सन-गॉड 'निका'च्या रुपात सर्वांसमोर येतो. या एपिसोडने लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले होते. यानंतर आता वानोचा चॅप्टर क्लोज झाला आहे.

पुढील आर्क कोणता?

यापुढे आता वन पीसमध्ये एगहेड आयलँड आर्क सुरू होणार आहे. टोई अ‍ॅनिमेशनने दिलेल्या माहितीनुसार, हा आर्क 7 जानेवारी 2024 पासून सुरू होईल. डिसेंबरमध्ये काही फिलर एपिसोड्स असतील की ब्रेक घेतला जाणार आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. टोई अ‍ॅनिमेशनने एगहेड आर्कचा टीजर देखील प्रदर्शित केला आहे.

काय असतात आर्क?

ज्याप्रमाणे काही सीरीजमध्ये सीझन्स असतात, त्याचप्रमाणे काही अ‍ॅनिमे सीरीजमध्ये आर्क असतात. एका आर्कमध्ये एक विशिष्ट स्टोरीलाईन दाखवली जाते. सीझन्स आणि आर्कमधील एक मोठा फरक म्हणजे, एपिसोड्सची संख्या. एखाद्या सीरीजच्या प्रत्येक सीझनमध्ये शक्यतो ठराविक एपिसोड्स असतात. मात्र, आर्कमध्ये वेगवेगळे एपिसोड्स असू शकतात. (What are Anime Arcs)

उदाहरण द्यायचं झाल्यास 'वन पीस'च्या रिव्हर्स माउंटन आर्कमध्ये अवघे दोन एपिसोड आहेत. तर दुसरीकडे याच अ‍ॅनिमेमधील वानो आर्कमध्ये सुमारे 200 एपिसोड्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT