onkar bhojane is back on maharashtrachi hasyajatra  SAKAL
मनोरंजन

Maharashtrachi Hasyajatra: "मी येतो नाहीतर नाय येत", ओंकार भोजनेची हास्यजत्रेत पुन्हा धमाल, नवीन प्रोमो बघाच!

ओंकार भोजनेची हास्यजत्रेत पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री

Devendra Jadhav

Maharashtrachi Hasyajatra Onkar Bhojane is Back: महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सोनी मराठीवरील सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम. महाराष्ट्राची हास्यजत्राने गेली अनेक वर्ष सर्वांना खळखळून हसवलंय. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील सर्वांचा लाडका कलाकार म्हणजे ओंकार भोजने.

ओंकार गेले अनेक महिने महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये दिसला नाही म्हणुन अनेक जण त्याला मिस करत होते. पण आता सर्वांसाठी खुशखबर. ओंकारची महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री झालीय.

ओंकारची हास्यजत्रेत पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री

सोनी मराठीने महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचा नवीन प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोत ओंकार भोजने पुन्हा एकदा हास्यजत्रेच्या एका स्कीटमध्ये सर्वांना हसवायला सज्ज झालाय.

"माझं असंच आहे. मी येतो नाहीतर येत नाय."

"माझ्यावर का ओरडताय, कधी नव्हे तर मी एकदा आलोय तर सर्व माझ्यावर येऊ नका," अशा खास डायलॉगने ओंकार हास्यजत्रेत पुन्हा एकदा धम्माल आणताना दिसतोय.

ओंकार भोजनेच्या पुन्हा एन्ट्रीने चाहते खुश

ओंकार भोजनेने त्याच्या खास विनोदी अभिनयाने महाराष्ट्राची हास्यजत्रा शो गाजवलाय. कधी अगं अगं आई म्हणत ओंकार हसवतो, तर कधी इलेक्ट्रीशयन तात्या बनत तो गौरव मोरेला सतवतो. ओंकारने महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून स्वतःचा असा चाहता वर्ग तयार केलाय.

आता महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये पुन्हा एकदा ओंकार भोजनेची एन्ट्री झाल्याने त्याच्या चाहत्यांना आनंद झालाय. अनेकांनी कमेंट करत ओंकारचं स्वागत केलंय.

ओंकारने घेतलेला महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून ब्रेक?

दरम्यान ओंकार भोजने अनेक महिने महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये दिसत नव्हता. त्याने हास्यजत्रेतुन ब्रेक घेतला असं बोललं जात होतं. मधल्या काळात ओंकार फू बाई फूच्या नवीन पर्वात झळकला. याशिवाय सरला एक कोटी सिनेमात ओंकार दिसला. सध्या ओंकार भाऊ कदम यांच्यासोबत करुन गेलो गाव नाटकात झळकत आहे.

ओंकारने हास्यजत्रा सोडली असली तरीही तो कलाकारांच्या संपर्कात होता. आता महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये ओंकार परत आल्याने सर्वांना आनंद झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akwan Cyclone Live News : अक्वान चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कसा परिणाम होणार? ताशी १०० किमी वेग, चक्रीवादळ धुमाकूळ घालणार

IND vs NZ: ODI मालिका जिंकली, पण भारतीय संघाला ICC चा मोठा दणका! ठोठावला मोठा दंड, पण का?

Maharashtra Government: ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा! शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांसाठी ६,८४० कोटींच्या निधीची शिफारस, मंत्री बावनकुळेंनी घेतले महत्त्वाचे निर्णय

Zodiac Sign Benefits: ४०० वर्षांनंतर मंगळ, केतू आणि गुरुची युती! मेष ते कुंभ राशींपर्यंत कोणत्या राशींना मिळणार लाभ?

आजचे राशिभविष्य - 19 नोव्हेंबर 2026

SCROLL FOR NEXT