Onkar Bhojane is traitor!! namrata sambherao epic reply to fan maharashtrachi hasyajatra  SAKAL
मनोरंजन

Onkar Bhojane: तु गद्दार आहेस ओंकार भोजने!! फॅन असं म्हणताच नम्रताने दिलं हे उत्तर, म्हणाली..

अचानक एक गोष्ट घडलीय, ज्यामुळे ओंकारला त्याचा एक फॅन गद्दार म्हणालाय

Devendra Jadhav

Onkar Bhojane and Namrata Sambherao News: महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो प्रेक्षकांच्या लाडका. शो मधील अनेक कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेत. या शो मधील असाच एक सर्वांचा लाडका कलाकार म्हणजे ओंकार भोजने.

ओंकार भोजनेने आजवर महाराष्ट्राची हास्यजत्रात विविध भुमिका साकारल्या. ओंकारचे सोशल मिडीयावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे.

पण अचानक एक गोष्ट घडलीय, ज्यामुळे ओंकारला त्याचा एक फॅन गद्दार म्हणालाय. पण या सर्वात नम्रता मात्र ओंकारबद्दल जे म्हणाली त्याची जास्त चर्चा झालीय.

(Onkar Bhojane is traitor!! namrata sambherao epic reply to fan maharashtrachi hasyajatra)

झालं असं की, नम्रताने सोशल मिडीयावर प्रसाद खांडेकर आणि ओंकार भोजनेचा एक सेल्फी पोस्ट केलाय. या फोटोखाली एकाने कमेंट केलीय की, तु गद्दार आहेस ओंक्या..

तु तुझ्या सर्व फॅन्ससोबत गद्दारी केली आहेस. मिस करतो आम्ही तुला सगळे. का सोडलीस हास्यजत्रा. निदान निमिषसारखं कधीतरी यायचं ना काही स्कीटसाठी. ये एकदा परत.

खुप आनंदी होऊ आम्ही सगळे पुन्हा हास्यजत्रेत पाहून. फॅन्सची ही कमेंट खुप व्हायरल झालीय. आता यावर नम्रताने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

नम्रता म्हणाली.. असं काही नाहीये.. त्याला नवीन गोष्टी, नवीन मार्ग, नवीन संकल्पना, नवीन उपक्रम स्वतःला शोधायचे होते. त्यामुळे आपण त्याच्या निर्णयांचा आदर केला पाहिजे आणि त्याला पाठिंबा दिला पाहिजे.. अशी पोस्ट नम्रताने केलीय.

नम्रताने दिलेल्या उत्तराने सर्वांची मनं जिंकली आहेत. एकुणच महाराष्ट्राची हास्यजत्रा ओंकारने सोडली असली तरीही हास्यजत्रेच्या कलाकारांच्या तो संपर्कात आहे.

सध्या मनोरंजन विश्वातील लोकप्रिय शो म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

स्वतः हास्यजत्रेतील कलाकारांनी याविषयी संकेत दिलीयत. महाराष्ट्राची हास्यजत्रामधले कलाकार प्रियदर्शनी इंदलकरने हास्यजत्रेचा सेटचा फोटो पोस्ट केलाय.

भेटूया २ महिन्यांनी, अशी प्रियदर्शनी इंदलकरने पोस्ट केलीय. 

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो बंद व्हायचं कारण म्हणजे सोनी मराठीवर लवकरच कोण होईल मराठी करोडपतीचा नवीन सिझन सुरू होतोय. पुन्हा एकदा अभिनेते सचिन खेडेकर KBC मराठीचा नवीन सिझन होस्ट करणार आहेत.

29 मेपासून, सोम. ते शनि., रात्री 9 वाजता KBC मराठी सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे. अशाप्रकारे हास्यजत्रा २ महिन्याचा ब्रेक घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला रुजू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT