Onkar Bhojane new marathi movie sarla ek koti coming soon cast release date sakal
मनोरंजन

Onkar Bhojane: हास्यजत्रा सोडली, फू बाई फू फसलं तरी ओंकार भोजने फॉर्मात.. आता थेट मोठा पडद्यावर..

अभिनेता ओंकार भोजनेवर झालेल्या मोठ्या टिकेनंतर तो घेतोय मोठी झेप..

नीलेश अडसूळ

Onkar Bhojane News: टीव्ही मनोरंजन विश्वात आपल्या अभियनयानं लाखो मराठी चाहत्यांची पसंती मिळवणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये ओंकार भोजनेचं नाव घेतलं जातंय. तो आता मराठीतला कॉमेडी किंग म्हणून नावारुपाला आला आहे. त्याचा परफॉर्मन्स, विनोदाचं टायमिंग हे सारं कमालीचं प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही महिन्यात ओंकार च्या आयुष्यात बऱ्याच वाईट घडामोडी घडत असतानाच, त्याच्यावर टीका होत असतानाच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हास्यजत्रा आणि फू बाई फू नंतर ओंकार आता मोठ्या पडद्यावर तेही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

सोनी मराठी वरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून आपल्या भेटीला आलेल्या या कलाकाराने अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. पण हास्यजत्रा सोडल्यानंतर त्यावर सडकून टीकाही झाली. लोकांनी त्यावर नाना आरोप केले. मग तो 'झी' मराठी वरील 'फू बाई फू' या कार्यक्रमात गेला. पण तोही कार्यक्रम लोकांचे मनोरंजन करण्यात असमर्थ ठरला. शेवटी अत्यंत कमी वेळात वाहिनीने हा कार्यक्रम गुंडाळला. त्यावेळी ओंकार आता काय करणार, त्याला हास्य जत्रेत परत घ्या अशी मागणी चाहत्यांनी केली. पण आता ओंकार ने एक मोठा सुखद धक्का दिला आहे. त्याने आपले आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

'सरला एक कोटी' असे या सिनेमाचे नाव असून पोस्टरमध्ये ओंकारचा एक वेगळा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.या पोस्टर मध्ये ओंकार एका अंधाऱ्या खोलीत पत्ते घेऊन आणि सोबत दारूची बॉटल, ग्लास असा बसला आहे. या पोस्टर वर, 'जो नशिबालाही डावावर लावतो तोच खरा गॅम्बलर' असे लिहिले आहे. यामध्ये ओंकार एखाद्या अट्टल गुंडासारखा दिसत आहे. पण त्याची नेमकी भूमिका काय भूमिका आहे अद्याप कळलेले नाही. येत्या 20 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सिंधुविजय सुपेकर यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT