Oppenheimer Day 1 Collection: Esakal
मनोरंजन

Oppenheimer Day 1 Collection: बॉलिवूड अन् टॉलिवूड राहिलं बाजूला! हॉलिवूडच्या ‘ओपनहायमर’नं पहिल्याचं दिवशी कमावले इतके कोटी...

Vaishali Patil

Oppenheimer Day 1 Collection: गेल्या अनेक दिवसांपासून हॉलिवूड सिनेमा ओपनहायमर या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. शुक्रवारी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला.

नोलान यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा ओपेनहायमर नावाच्या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेता सिलियन मर्फी प्रमुख भुमिकेत आहे.

आता या सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगालाच गल्ला जमावला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीच पडला आहे.

मात्र या सिनेमातील एका सीन वरुन सोशल मिडियावर खुपच राडा झाला. या चित्रपटाच्या एका दृश्यात दाखवण्यात आलं आहे की, ज्यावेळी चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री रोमांस करत असतात त्यावेळी ती अभिनेत्याला गीता वाचायला सांगते. या दृश्यामुळे सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

तरी देखील या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. या सिनेमाच्या पहिल्या दिवशाच्या कमाईचे आकडे आता समोर आले आहेत.

'ओपनहायमर' चित्रपटाने भारतात 13.50 कोटींची ओपनिंग केली आहे. मोठी ओपनिंग घेणारा हा चित्रपट या वर्षातील पहिला हॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

तर 12 जुलैला रिलीज झालेल्या 'मिशन इम्पॉसिबल 7'ने 12. 25 कोटींची ओपनिंग केली होती. त्याच वेळी, 19 मे रोजी रिलीज झालेल्या विन डिझेलच्या 'फास्ट एक्स'ने जवळपास 12 कोटींची ओपनिंग केली होती. त्यामुळे आता सर्वांत जास्त ओपनिंग देणारा हा पहिला सिनेमा ठरला आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मिशन इम्पोसीबल 7’ आणि ‘फास्ट एक्स’ या दोन्ही चित्रपटांना मागे टाकत ‘ओपनहायमर’ भारतात पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

भारतात 'ओपनहायमर'ची जोरदार क्रेझ निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या अॅडवान्स बुकिंग करत प्रेक्षकांनी या चित्रपटात प्रचंड उत्सुकता दाखवली. क्रिस्टोफर नोलन यांनी ओपेनहाइमरचे दिग्दर्शन केले आहे. यात सिलियन मर्फी, एमिली ब्लंट, मॅट डॅमन, रॉबर्ट डाउनी ज्युनियर, फ्लोरेन्स पग हे कलाकार आहेत. जे जगभर आधीच खुप प्रसिद्ध आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT