Opportunity for Kailash Khadsan in Nagraj Manjule short film
Opportunity for Kailash Khadsan in Nagraj Manjule short film sakal
मनोरंजन

अकोट : नागराज मंजुळेंच्या लघुपटात कैलास खडसान यांना संधी

सकाळ वृत्तसेवा

अकोट तालुक्यातील संतनगरी मुंडगाव हे वेग-वेगळ्या क्षेत्रात आपले नाव करणाऱ्या व्यक्ती विशेषांचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. यापैकीच एक कलाकार म्हणजे कैलास खडसान यांनी अनेक लघुपटात महत्त्वाच्या भूमिका साकरल्या आहेत. नुकतीच त्यांना नागराज मंजुळे यांच्या ‘पाठवणी’ या लघुचित्रपाटात काम करण्याची संधी मिळाल्याने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

समाज सेवेची जाणीव असलेल्या खडसान यांचा गावातील प्रत्येक सामाजिक, सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग असतो. वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांच्या विचारांनी प्रेरीत होवून त्यांनी गाडगे बाबांच्या विचारांना समाजातील तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रबोधन करून एक आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे. ते सतत गाडगे महाराजांच्या जीवनावर वेगवेगळे प्रबोधनाच्या कार्यक्रम करीत असतात. या कार्यक्रमाकरिता अनेक ठिकाणावरून आयोजक मंडळ त्यांना आमंत्रित करीत असतात.

अत्यंत अल्पश: मानधनावर ही सेवा खडसान देत असतात. लहानपणापासून अभिनयाची आवड असल्याने शालेय कार्यक्रमात भाषण, संचलन, लहान-लहान नाटिकेत अभिनय करणे हे नित्याचेच होते. आज संसाराचा गाडा ओढत असताना धकाधकीच्या जीवनात त्यांनी अभिनयाची आवड कमी होवू दिली नाही. त्यामुळे त्यांना चित्रपट, लघुपट, नाटक यात संधी मिळत आहेत. जॅकी श्रॉफ, संजय खापरे, दीपाली सय्यद, प्रेमा किरण या दिग्गज अभिनेत्यांनी अभिनय केलेल्या ‘शेगावीचा राणा गजानन’ या चित्रपटानंतर ‘टम्रेल’, ‘महिमा मुंडगावचा’ या लघुपटात सुरेख अभिनय केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT