मनोरंजन

VIDEO: 'बचपन का प्यार' गाणं नेमकं आलं कुठून? जाणून घ्या

कार्तिक पुजारी

‘जाने मेरी जानेमन, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे, जस्सा मेरा प्यार है, प्यार मैने किया है' गाणं म्हणणाऱ्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

‘जाने मेरी जानेमन, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे, जस्सा मेरा प्यार है, प्यार मैने किया है' गाणं म्हणणाऱ्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. फेसबुक, इन्स्टा रिल्सवर या गाण्याने अक्षरश: धुमाकूळ घातलाय. सेलिब्रिटींनासुद्धा यावर व्हिडिओ करण्याचा मोह आवरलेला नाहीय. हे गाणं ऐकूण अनेकांना आपलं बचपन का प्यार आठवू लागलंय. खरंतर हे गाणं तीन वर्षापूर्वीचं. पण, आता ते ट्रेंड होतंय. व्हायरल व्हिडिओतील मुलगा कोण, गाण्याचा मूळ गायक कोण याची माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. (Entertainment Marathi News)

व्हिडिओतील लहान मुलाचं नाव आहे सहदेव. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातल्या छिंदवड गावात सहदेव राहतो. वडील गरीब शेतकरी, घरात साधा टीव्हीही नाही. पण, या पोरानं असे काही सुर लावलेत की देशच नाही, तर जगातील अनेक लोकांना या गाण्याची भूरळ पडलीये.

सहदेवचा हा व्हीडिओ आहे 2019 चा. तेव्हा तो पाचवीत शिकत होता. मॅडमने त्याला गाणं म्हणायला सांगितलं, तेव्हा सहदेवनं बचपन का प्यार म्हणणं सुरु केलं. आता त्यानं हे गाणं नेमकं कुठं ऐकलं माहिती नाही, पण मॅडमला ते इतकं आवडलं की त्यांनी ते रेकॉर्ड केलं आणि सोशल मीडियावर सोडून दिलं. मोठ मोठ्या स्टार्सनी यावर रिल बनवल्या. सहदेवच्या गाण्याची दखल छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनाही घ्यावीसी वाटली. त्यांनी त्याची भेट घेत लाईव्ह गाणं ऐकलं आणि त्यांचं कौतुक केलं.

सगळ्यात आधी आपल्या डिजे वाला बाबू बादशहाने सहदेवच्या गाण्यावर रिल बनवली होती. त्यानंतर गाणं व्हायरल होऊ लागलं आणि सोशल मीडियावर जिकडं-तिकडं नुसती सहदेवचीच हवा होऊ लागली. प्रत्येकजण हेच गाणं गुणगुणू लागलं. बादशहाने तर सहदेवला एका गाण्याची ऑफऱ देऊन टाकलीये. लवकरच सहदेव बादशहाच्या भेटीसाठी चंदीगडला जाणारंय. काही दिवसातच आपल्याला तो बादशहासोबत गाताना दिसेल.

हे गाणं ओरिजिनल कुणाचंय, तुम्हाला माहितीये का?

हे ऑरिजनल गाणं आहे कमलेश बरोट यांचं. बरोट हे गुजरातमधील आदिवासी लोकगायक आहेत. २०१८ मध्ये पी.पी बरिया यांनी या गाण्याची रचना केली होती आणि याला संगीत मयूर नदिया यांनी दिलं होतं. २०१९ मध्ये या गाण्याचे कॉपिराईट मेशवा फिल्मसला विकण्यात आले. त्यानंतर कंपनीने हे गाणं आपल्या यूट्यूबवर चॅनलवर टाकलं. या गाण्याला यूट्यूबवर आतापर्यंत ४४ लाखांपेक्षा अधिक व्हिव्हूज मिळालेत. पण, या गाण्याला खरे चार चाँद लावले आपल्या सहदेवनं. ऑरिजनल गाण्यापेक्षा सहदेवचं गाण लोकांना जास्त आवडू लागलंय. एका व्हायरल व्हीडिओमुळे सहदेव एकादिवसात स्टार झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT