Ormax Most popular male film stars in India: Esakal
मनोरंजन

Top Celebrities List: आजही शाहरुख खानच बादशाह तर अभिनेत्रींमध्ये कुणाचं नाव?

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अशा सेलिब्रेटींची यादी समोर आली आहे.

Vaishali Patil

Ormax Most popular male film stars in India: सध्या मनोरंजन विश्वात अनेक कलाकारांचे वर्चस्व पहायला मिळत आहे. मग ते बॉलिवूडस्टार असो किंवा टॉलिवूड. सर्वांची क्रेझ पहायला मिळत आहे.

यंदा शाहरुख खान, अक्षय कुमार, साउथ स्टार प्रभास , थलपती विजय, विजय देवरकोंडा असे अनेक कलाकार चर्चेत आहे. तर अभिनेत्रीही मागे नाहीत. आलिया, सामंथा, रश्मिका , दीपिका अन् क्रिती सेनन यांची लोकप्रियता तर सर्वांनाच माहीत आहे.

मात्र यातील भारताचा लोकप्रिय स्टार कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडतो.तर याचाच खुलासा आता झाला आहे.

मीडिया फर्म Ormax ने सर्वात लोकप्रिय अभिनेता आणि अभिनेत्री यांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्व अभिनेते आणि अभिनेत्रींचा टॉप 10 मध्ये समावेश करण्यात आला आहे.

आता या यादित पठाण आणि जवान सारखे हिट सिनेमे देणारा बॉलिवूडचा किंग शाहरुख खान अव्वल स्थानी आहे. एका वर्षात हजार कोटींची कमाई करणारे सिनेमे देणारा शाहरुख हा पहिला बॉलिवूड हिरो ठरला आहे, तर आता Ormax नुसार तो सर्वात लोकप्रिय कलाकारही बनला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर साउथ कलाकारांनी बाजी मारली आहे.

यात लिओ स्टार विजय दुसऱ्या आणि बाहूबली स्टार प्रभास तिसऱ्या स्थानावर आहेत. तर यादित अक्षय कुमार चौथ्या आणि सलमान खान पाचव्या स्थानावर आहेत. विषेश म्हणजे या यादीत साऊथचे स्टार अजित कुमार, ज्युनियर एनटीआर, अल्लू अर्जुन, सूर्या आणि महेश बाबू या कलाकारांचादेखील सामावेश आहे.

त्याचबरोबर Ormaxने सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींची यादीही प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री आलिया भट्ट पहिल्या क्रमांकावर आहे. तर तिच्यानंतर साउथ स्टार सामंथा रुथ प्रभू,पुढे दीपिका पदुकोण आणि त्यानंतर नयनतारा या यादित आहे.

या तीन अभिनेत्रींच्या नावाव्यतिरिक्त कियारा अडवाणी, कतरिना कैफ, काजल अग्रवाल, त्रिशा, तमन्ना आणि क्रिती सेनन या अभिनेत्रींचाही या यादित समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT