Oscar Latest news esakal
मनोरंजन

Oscar 2024 News : 'या' कारणासाठी यंदाचा 'ऑस्कर' ठरणार खास! काय आहे ती गोष्ट?

या वर्षीचा ऑस्कर (Oscar 2024 News ) हा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत राहणार असल्याचे बोलले जात आहे.

युगंधर ताजणे

Oscar 2024 News: जगप्रसिद्ध ऑस्कर सोहळा हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाचा सोहळा देखील अशाच एका कारणासाठी लाईमलाईटमध्ये राहणार आहे.असे बोलले जात आहे. या वर्षीच्या सोहळ्यात ७० ते ८० वर्षांच्या सिनेमेकर्सचे ऑस्करसाठी नॉमिनेशन असल्याचे सांगण्यात येत आहे. हा ऑस्करच्या इतिहासातील सुवर्णकाळ असून त्याची योग्य ती दखलही घेण्यात येणार असे बोलले जात आहे.

एकीकडे राजकारणात कितीही वय असलं तरी तुमचं लोकांमधील काम आणि भूमिका यावर बरीच मोठी मदार असते. मात्र कलेच्या क्षेत्रात ती गोष्ट वेगळ्या प्रकारे समोर येते. म्हणूनच की काय अजुनही सिनेमा क्षेत्रात वयाच्या ८० व्या वर्षी कार्यरत असणाऱ्या निर्माता, दिग्दर्शक यांच्याविषयी वेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.वृद्ध निर्माते आणि दिग्दर्शकांसाठी ऑस्कर नॉमिनेशन हे एका सुवर्णसंधी पेक्षा कमी नाही.

या सगळ्यात प्रसिद्ध कलाकार हयाओ मिजाजाकी यांच्याविषयी बोलायचे झाल्यास ते आता ८३ वर्षांचे आहेत. त्यांनी म्हटले आहे की, जगाला सांगण्याची गरज नाही की तुम्ही किती वर्षांचे आहात आणि तुम्ही का रिटायर होत आहात. मला वाटतं तुम्ही पुन्हा दमदारपणे पुनरागमन करण्याची गरज आहे. सध्याच्या घडीला मियाजाकी हे सर्वोत्कृष्ट चित्रपट कॅटगिरीमधून नॉमिनेशन असलेले दिग्दर्शक आहेत. जर त्यांनी १० मार्चला होणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात ऑस्कर जिंकलं तर तो पुरस्कार स्विकारणारे ते सर्वात वयोवृद्ध दिग्दर्शक असतील.

व्हिज्युअल इफेक्टस् आणि प्रॉडक्शन डिझाईन या प्रकारातून ८६ वर्षांच्या रि़डले स्कॉट यांना नामांकन मिळाले आहे. त्यानंतर ८१ वर्षांच्या मायकल मान यांच्याविषयी बोलायचे झाल्यास त्यांची फरारी नावाची फिल्म प्रसिद्ध झाली आहे. मात्र त्याचे नामांकन काही झालेलं नाही. ७८ वर्षांच्या विम वेंडर्स यांना परफेक्ट डेजसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिल्स साठी नामांकन मिळालं आहे.

८१ वर्षीय मार्टिन स्कॉर्सेसी यांच्या किलर्स ऑफ द फ्लॉवर मून नावाच्या चित्रपटासाठी बेस्ट डायरेक्टर म्हणून त्यांना नॉमिनेशन मिळाले होते. बेस्ट डायरेक्टर साठी स्कॉर्सेसी हे सर्वात वयोवृद्ध दिग्दर्शक आहेत. यापूर्वी त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, मी प्रत्येक गोष्टीसाठी खूपच उत्सुक असतो. मला वाटतं आपल्या प्रगतीसाठी उत्सुकता नावाची गोष्ट आता खूपच महत्वाची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT