Oscar Awards 2024  esakal
मनोरंजन

Oscar 2024 Latest Updates : 'ऑस्कर'च्या ट्रॉफीची 'ती' खास गोष्ट माहितीये? ज्याच्या हाती येते ती बाहुली त्याला तब्बल....!

ऑस्करच्या (Oscar 2024 Latest Updates ) सोहळ्यात सर्वाधिक चर्चा असते ती ऑस्करच्या ट्रॉफीची....

युगंधर ताजणे

Oscar 2024 Latest News : सध्या मनोरंजन विश्वात प्रसिद्ध अशा ऑस्कर सोहळ्याची चर्चा होताना दिसत आहे. यंदाचा ऑस्कर सोहळा हा ९६ वा (Oscar 2024 News) अकादमी पुरस्कार सोहळा असून त्याची वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून यंदाचा ऑस्कर सोहळा (Oscar Latest News) हा वैशिष्ट्यपूर्ण ठरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये या सोहळ्याचे आय़ोजन करण्यात आले आहे.

जगभरातील सिनेप्रेमींना ऑस्कर सोहळ्याची उत्सुकता असते. वर्षभरात जगातील विविध थिएटर्समधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आणि (Oscar Latest Marathi News) सद्यस्थितीवर मार्मिकपणे भाष्य करणाऱ्या कलाकृतींना ऑस्करच्या नामांकन यादीमध्ये स्थान दिले जाते असे म्हटले जाते. या सगळ्यात सगळ्यांना उत्सुकता, कुतूहल असते ते ऑस्करच्या ट्रॉफीचे. त्याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

ऑस्कर जिंकल्यानंतर विजेत्यांना ट्रॉफीसोबत किती रुपयांचे बक्षीस मिळते, त्या ट्रॉफीचे वैशिष्ट्य काय याबद्दल अनेकांना उत्सुकता असते.ते आपण माहिती करुन घेणार आहोत. खरं तर एखादी फिल्म ऑस्करसाठी नॉमिनेट होती हीच मुळी मोठी गोष्ट असते. गेल्या शंभरहून अधिक वर्षांची परंपरा असणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यावर मोहोर उमटवावी असे अनेक दिग्दर्शक, कलाकार यांची इच्छा असते. त्यामुळे ऑस्करच्या कोणत्याही कॅटगिरीमध्ये नॉमिनेशन मिळणे हीच मोठी गोष्ट असते.

आपली कलाकृती ऑस्करसाठी नामांकित आहे असे म्हटल्यावर त्याला मिळणारं पैशाचं बक्षीस फारसं महत्वाचं ठरत नाही असे बोलले जाते. मीडिया रिपोर्टस अन् अमर उजालाच्या एका बातमीनुसार, ऑस्कर जिंकणाऱ्याला बक्षीस म्हणून कोणत्याही प्रकारे पैसे दिले जात नाही. यात अॅकडमी अॅवॉर्डकडून गोल्ड प्लेटेड ट्रॉफी मिळते. पैशांशिवाय इतर अनेक फायदे संबंधित कलाकाराला मिळतात ती गोष्ट वेगळी.

ऑस्कर मिळाल्यानंतर संबंधित दिग्दर्शक, कलाकार आणि अन्य संबंधित लोकांची ब्रँड व्हॅल्यू अधिक वाढते. असे म्हटले जाते. ऑस्कर मिळवणाऱ्यांना जी गुडी बॅग दिली जाते त्यात काही डॉलर्स असतात. ऑस्करची ट्रॉफी ही कांस्य धातूची असते. त्यावर २४ कॅरेट सोन्याचा मुलामा दिलेला असतो. ते सगळे तयार करण्यासाठी एक हजार डॉलर अर्थात ८२ हजार रुपये खर्च होतो असे म्हटले जाते.

यात जर एखाद्या विजेत्याला त्याची ट्रॉफी विकायची असल्यास ती फक्त अॅकडमीलाच विकता येते. तुम्हाला एक गोष्ट ऐकल्यावर खोटं वाटेल तुम्ही जेव्हा ती ट्रॉफी पुन्हा अॅकडमीला देता तेव्हा त्याची किंमत ही फारच कमी होते. अॅकडमी खूप कमी डॉलरमध्ये संबंधिताकडून ट्रॉफी विकत घेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG दरवाढीचा नवा धक्का! गेल्या ११ दिवसांतील ही चौथी वाढ... मुंबई-पुण्यात दर किती?

'तो संपूर्ण रात्र दुसऱ्या महिलेसोबत राहिला तरी...' तबिंदा सनपाल नवऱ्याबद्दल बोलताना म्हणाली...'तो दर दिवाळीत तीन किलो सोनं देतो'

Chandgad Drowning Child : आजीच्या निधनामुळे गावी गेल्या अन् तीन शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू, चंदगडमधील घटना; लहान भावाचे प्रयत्न असफल...

Buldhana Tragedy: पत्नीशी वादानंतर टोकाचे पाऊल! चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलून पित्याने जीवन संपवले, बुलडाण्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Maharashtra Accident: सोमवार ठरला ‘अपघातवार’; एकच दिवशी १४ जणांचा मृत्यू, आंबेनळीत मोटार कोसळून आठ तर तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT