Oscars 2023 RRR Wins
Oscars 2023 RRR Wins Esakal
मनोरंजन

Oscars 2023 RRR Wins: फक्त अभिमान! राजकीय नेत्यांपासून ते बॉलिवूडकरांपर्यंत RRRवर शुभेच्छांचा वर्षाव..

सकाळ डिजिटल टीम

आजची सकाळ प्रत्येक भारतीयासाठी खुप आनंदाची आहे. त्याच कारणही तसच आहे. गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय या बातमीची वाट पहात होते. भारताने ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये बाजी मारली आहे. यावेळी भारतातून तीन चित्रपटांनी ऑस्करसाठी दावेदारी सादर केली होती, त्यापैकी दोन चित्रपट यांनी ऑक्सर जिंकले आहेत.

एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत तर द एलिफंट व्हिस्पर्सला सर्वोत्कृष्ट लघुपट प्रकारात पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्तानं देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. तर सेलेब्सकडूनही विजेत्यांचं अभिनंदन करणं सुरु आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही ट्विट करत या अभिमानास्पद क्षणाबद्दल देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिलयं, ‘नाटू नाटू’ची लोकप्रियता जागतिक आहे. पुढील अनेक वर्षे स्मरणात राहणारे हे गाणे आहे. संगीतकार एम एम कीरावानी, गीतकार चंद्रबोस यांचे आणि या प्रतिष्ठित सन्मानासाठी संपूर्ण टीम अभिनंदन अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

देशाचे माजी उपराष्ट्रपती आणि दिग्गज नेते एम व्यंकय्या नायडू यांनीही संघाचे अभिनंदन केले. चित्रपटाच्या गाण्याचे पोस्टर शेअर करताना त्यांनी लिहिले, ऑस्कर जिंकून इतिहास रचल्याबद्दल संगीतकार एम एम कीरावानी, गीतकार चंद्रबोस, दिग्दर्शक राजामौली आणि #RRR टीमचे खूप खूप अभिनंदन.

साऊथ स्टार आणि बाहुबली फेम राणा दग्गुबती याने पुरस्कार सोहळ्यातील व्हिडिओ शेअर केला असून पुरस्कार जिंकल्याबद्दल चित्रपटाचं अभिनंदन केले आहे.

Oscars 2023 RRR Wins

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनेही दोन्ही ऑस्कर विजेत्या चित्रपटांचे अभिनंदन केले आणि इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केले. विषेश म्हणजे आलिया देखील या चित्रपटाचा एक भाग होती आणि तिने यात एक छोटी भूमिका साकारली होती. याशिवाय अजय देवगणही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.

बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर इतके उत्साहित झाले की पुरस्कार जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी आरआरआरच्या टीमचे अभिनंदन केले.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील ऑस्कर सोहळ्याचा आनंद लुटत असून तिनेही पुरस्कार विजेत्या चित्रपटांना शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांच्याशिवाय कंगना रणौतनेही RRR टीमचे अभिनंदन केले आणि पुरस्कार मिळाल्याबद्दल देशाचे आभार मानले. लोकांना ही मोठी बातमी कळू लागल्याने या दुहेरी आनंदाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT