Oscars 2024 to kill a tiger india based documentary in the Oscars race SAKAL
मनोरंजन

Oscars 2024: भारतातील सत्य घटनेवर आधारित ही डॉक्युमेंट्री ऑस्करच्या शर्यतीत, काय आहे विषय?

This documentary based on a true incident in India is in the race for Oscar: ऑस्कर 2024 मध्ये भारतातीत सत्य घटनेवर आधारित या डॉक्युमेंट्रीला नॉमिनेशन मिळालं आहे

Devendra Jadhav

Oscars 2024 To Kill A Tiger News: काल ऑस्कर 2024 चं नामांकनाची यादी समोर आली. ओपेनहायमर आणि बार्बी यंदाच्या ऑस्कर 2024 च्या शर्यतीत आहेत.

यंदाच्या ऑस्करमध्ये भारतातील एका सत्य घटनेवर आधारित एक माहितीपट सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीच्या शर्यतीत नॉमिनेटेड आहे. तो म्हणजे टू किल अ टायगर.

96 व्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट श्रेणीत याला नामांकन मिळाले आहे. जाणून घ्या सविस्तर...

काय आहे या डॉक्युमेंट्रीचा विषय?

ही डॉक्युमेंट्री न्यायासाठी व्यवस्थेशी लढणाऱ्या रणजीतच्या आयुष्यावर आधारित आहे. रणजीतच्या मुलीवर तीन पुरुषांनी लैंगिक अत्याचार केले होते. टू किल अ टायगरमध्ये रणजीतने आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या खडतर संघर्षाचे चित्रण केले आहे.

या डॉक्युमेंट्रीची निर्मिती कॉर्नेलिया प्रिंसिपे आणि डेव्हिड ओपेनहाइम यांनी केली आहे. या माहितीपटाशिवाय Bobi Wine: The People's President, The Eternal Memory, Four Daughters and 20 Days in Mariupol यांनाही सर्वोत्कृष्ट माहितीपटात नामांकन मिळाले आहे.

टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दखल

'टू किल अ टायगर'चे दिग्दर्शन मूळच्या दिल्लीत राहणाऱ्या निशा पाहुजा यांनी केलंय. सध्या त्या टोरंटोमध्ये वास्तव्यास आहेत. टू किल अ टायगर या चित्रपटाने यापूर्वी टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट कॅनेडियन फीचर चित्रपटासाठी अॅम्प्लीफाई व्हॉईस पुरस्कार जिंकला होता. (Featured at the Toronto International Film Festival)

ऑस्कर 2024 मध्ये या चित्रपटांची चर्चा

रॉबर्ट ओपेनहायमरची भूमिका करणाऱ्या सिलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेता कॅटेगरीत नामांकन मिळाले आहे. याशिवाय 'ओपेनहायमर' 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून', 'बार्बी', 'द होल्डोव्हर्स' ('Oppenheimer' 'Killers of the Flower Moon', 'Barbie', 'The Holdovers') इत्यादी चित्रपटांची यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी स्पर्धा आहे. 96 व्या ऑस्कर पुरस्कारांचे आयोजन 11 मार्च रोजी जिमी किमेल यांच्या हस्ते होणार आहे. (Discussion of these films at Oscars 2024)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT