OTT Release
OTT Release 
मनोरंजन

OTT Release: ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका; वीकेंडला पाहा 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज

priyanka kulkarni

OTT Release: ओटीटीवर विविध वेब सीरिज (Web Series) आणि चित्रपट (Movies) रिलीज होत असतात. यंदाचा वीकेंड सिनेप्रेमींसाठी खास असणार आहे कारण वीकेंडला प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ आणि डिज्नी प्लस हॉटस्टार यांसारख्या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणारे चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकणार आहेत. ओटीटीवर रिलीज होणाऱ्या आणि रिलीज झालेल्या चित्रपट आणि वेब सीरिज यांच्याबद्दल जाणून घेऊयात...

द केरळ स्टोरी (The Kerala Story)

अभिनेत्री अदा शर्माचा द केरळ स्टोरी हा चित्रपट आज ( 16 फेब्रुवारी) ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट तुम्ही वीकेंडला पाहू शकता. द केरळ स्टोरी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही आता ते प्रेक्षक हा चित्रपट ओटीटीवर पाहू शकणार आहेत. झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

सालार (Salaar: Part 1 – Ceasefire)

सालार हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. पण हा चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात आला नव्हता. आता आज हा चित्रपट हिंदी भाषेत रिलीज करण्यात आला आहे. या वीकेंडला तुम्ही सालार हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी भाषेत पाहू शकता.

लव्ह इज ब्लाइंड (Love is Blind season 6)

नेटफ्लिक्सवरील लव्ह इज ब्लाइंड या वेब सीरिजचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजचे एकूण पाच सीझन याआधी रिलीज झाले होते. आता या वेब सीरिजचा सहावा सीझन रिलीज होणार आहे.

लव्ह स्टोरियां (Love Storiyaan)

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लव्ह स्टोरियां हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात सहा विविध प्रेमकथा दाखवण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT