Pakistan copies Amitabh bachchan Kaun Banega Crorepati concept, Taxi Cash quiz show. Google
मनोरंजन

पाकिस्ताननं चोरली अमिताभच्या 'कौन बनेगा करोडपती' ची संकल्पना; हुबेहूब तसाच शो,केला फक्त एकच बदल...

पाकिस्तानचा आरजे,होस्ट आणि अभिनेता खलिद मलिक या क्वीज शो चे सूत्रसंचालन करत आहे.

प्रणाली मोरे

Kaun Banega Crorepati: पाकिस्ताननं नेहमीच भारतीय सिनेमे आणि संगीताची चोरी केल्याचे अनेक दाखले आहेत. पण आता पाकिस्तानने भारतीय टेलीव्हिजनवरील रिअॅलिटी शोज च्या संकल्पनांची चोरी करायला सुरुवात केली आहे. फियर फॅक्टर शो ला कॉपी केल्यानंतर आता पाकिस्ताननं अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' शो च्या संकल्पनेला चोरी केल्याचं वृत्त आहे. या संकल्पनेवर आधारितच एक नवीन गेम शो पाकिस्तानच्या छोट्या पडद्यावर सुरु करण्यात आला आहे.(Pakistan copies Amitabh bachchan Kaun Banega Crorepati concept, Taxi Cash quiz show.)

भारतातला प्रसिद्ध टेलीव्हिजन शो कौन बनेगा करोडपतीला एक नवा ट्वीस्ट देत पाकिस्तानच्या टी.व्ही इंडस्ट्रीने आपल्या इथं एक अनोखा शो सुरु केला आहे. या गेम शो मध्ये स्पर्धक स्टुडिओतील हॉट सीटवर बसून नाही तर चालत्या गाडीत बसून प्रश्नांची उत्तरं देणार आहेत,या शो चे नाव आहे Taxi Cash.

दोन वेगवेगळ्या शो च्या संकल्पनांना चोरी करत हा नवा शो पाकिस्तानमध्ये सुरु करण्यात आला आहे. त्यातला एक आहे अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती' आणि दुसरा 'Carpool Karaoke'.या शो ला पाकिस्तानचा आरजे,होस्ट आणि अभिनेता खालिद मलिक होस्ट करत आहे. खालिद मलिक पाकिस्तानच्या रस्त्यांवर कार चालवत या क्वीज शोला होस्ट करणार आहे.

शो च्या संकल्पनेच्या संदर्भात बोलताना खालिद मलिक म्हणाला आहे की,''शो ची संकल्पना अशी आहे की,प्रवाशाला गाडी सर्वप्रथम बुक करायला लागेल. मग मी त्या प्रवाशाला पॉइंट A ते पॉइंट B जे काही ठरलं असेल तसा प्रवास घडवेन. आणि त्या प्रवासा दरम्यान मी त्याला प्रश्न विचारणार. बरेचसे प्रश्न हे जनरल नॉलेजवर आधारित असतील. वेगवेगळे राऊंडस् त्यात असतील आणि प्रत्येक राऊंड गणिक प्रश्न कठीण होत जातील''.

Taxi Cash शो बाबत मजेदार गोष्ट ही आहे की, कॅश प्राइज जिंकण्यासाठी स्पर्धकाला डेस्टिनेशनवर पोहोचण्याआधी विचारेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. जर कोणी स्पर्धक तीनदा चुकीचं उत्तर देईल तर त्याला पैसे मिळणार नाही आणि गाडीतून बाहेर उतरवलं जाईल.

Taxi Cash शो ३ ऑक्टोबरला सुरु झाला आहे, याचे ३ भाग प्रसारित झाले आहेत. आता हा शो पाकिस्तानात किती चर्चेत येतोय हे पाहण औत्सुक्याचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT