12th Fail:  Esakal
मनोरंजन

Bilal Qureshi On 12th Fail: बॉर्डरपार होतंय '12वी फेल'च कौतुक! पाकिस्तानी अभिनेताही झाला जबरा फॅन

केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही 12वी फेल चित्रपटाची चर्चा आहे. आता एका पाकिस्तानी अभिनेत्याने 12वी फेलचं कौतुक केलं आहे.

Vaishali Patil

12th Fail हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता हा सिनेमा ओटीटीवर रिलिज करण्यात आला आहे. हा सिनेमा लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटातून पुन्हा एकदा विक्रांत मॅसीने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले.

याआधीही विक्रांत मॅसीच्या चित्रपट आणि वेब सीरिजने लोकांच्या मनावर राज्य केले होते. मात्र आता चंबळच्या मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांना आवडत आहे.

कमी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट लोकांना मनापासून आवडला आहे. हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच OTT वर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर 12वी हा चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे अनेक बॉलिवूड स्टार्सनी कौतुकही केले आहे.

केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही 12वी फेल चित्रपटाची चर्चा आहे. आता एका पाकिस्तानी अभिनेत्याने 12वी फेलचं कौतुक केलं आहे.

प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेता बिलाल कुरेशीने त्याच्या इंस्टाग्रामवर एका स्टोरीमध्ये 12वी फेलचे पोस्टर शेअर केले. बिलालने हा सिनेमा पाहिला आणि तो या चित्रपटाचा फॅन झाल्याचं त्यानं सांगितलं. बिलाल आपल्या स्टोरीत लिहितो, ' खुप आवडला, आपणही असे प्रोजेक्ट करू शकू असे मला वाटते आपल्या समाजाच्या कल्याणासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.'

केवळ बिलालच नाही तर इतर देशांतील अनेक कलाकारांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. या सिनेमात विक्रांत मॅसीने आपल्या अभिनयाची अशी जादू दाखवली आहे.

बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटीवरही धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 64 कोटींहून अधिक कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली आहे.

12वी फेलचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केले आहे. आता12वी फेल सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT