saba bukhari 
मनोरंजन

"तडजोड केल्याशिवाय काम मिळणार नाही"; अभिनेत्रीने उघड केला दिग्दर्शकांचा खरा चेहरा 

स्वाती वेमूल

टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊच हा नेहमीच चर्चेत राहिलेला विषय आहे. #MeToo मोहिमेअंतर्गत अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. आता पाकिस्तानी अभिनेत्री सबा बुखारी हिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित कास्टिंग काऊचविरोधात आवाज उठवला आहे. सबाने इंडस्ट्रीत तिला आलेल्या अनुभवांविषयी या पोस्टमध्ये लिहिलं. 'एकाने म्हटलं, तुझ्यात इतका आत्मविश्वास नाही की तू या इंडस्ट्रीत पुढे जाऊ शकशील. दुसऱ्याने म्हटलं, तू खूप चांगली मुलगी आहेस आणि या क्षेत्रात चांगल्या मुलींचं काहीच होऊ शकत नाही. तिसऱ्याने म्हटलं, असं कसं शक्य असेल की कोणीच तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला नसेल. चौथ्याने म्हटलं, आम्ही तुला काम आणि पैसे का देऊ, जर इथे असंख्य मुली कामासाठी तडजोड करायला तयार आहे', असं तिने लिहिलं. वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडून आलेल्या या अनुभवांमुळे खचलेल्या सबाने अखेर त्याविषयी बोलायचं ठरवलं. 

सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्यानंतर सबाने 'बीबीसी उर्दू'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सांगितलं, "ऑडिशन दिल्यानंतर मला भूमिका मिळाल्याचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की, भूमिकेसाठी तुझी निवड झाली आहे. पण त्याबदल्यात आम्हाला तुझ्याकडून काहीतरी हवंय. मला आधी वाटलं की त्यांना माझ्याकडून पैसे हवे आहेत. ते देण्यासही मी तयार होते. पण त्यांनी मला शेजारी झोपण्याबाबत विचारणा केली. माझ्या पायाखालची जमीनच सरकली."

सबाने अनेक पाकिस्तानी मालिकांमध्ये काम केलंय. २०१३ मध्ये तिने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. सबाने मुलाखतीत किंवा सोशल मीडियावरील कोणत्याच दिग्दर्शकाचं नाव उघड केलं नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT