saeeda imtiaz Sakal
मनोरंजन

Saeeda Imtiaz: पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू, खोलीत सापडला मृतदेह

पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल सईदा इम्तियाजबद्दल धक्कादायक बातमी समोर येत आहे.

Aishwarya Musale

पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल सईदा इम्तियाजबद्दल धक्कादायक बातमी समोर येत आहे. सईदाचे आकस्मिक निधन झाले आहे. सईदाच्या मृत्यूची बातमी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी पोस्ट करून दिली आहे.

सईदाचा मृतदेह तिच्या घरातील एका खोलीत सापडल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी ही दु:खद बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला असून संशयास्पद परिस्थितीत झालेल्या या मृत्यूमागचे कारण काय, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या टीमने पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये असे लिहिले आहे की, 'अत्यंत दुःखाने कळवत आहे की सईदा इम्तियाज या जगात नाहीत. आज सकाळी ती तिच्या खोलीत मृतावस्थेत आढळली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो - Admin.'

या स्टोरीपूर्वी , अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये तिने लिहिले होते- 'मला ज्याची गरज होती ती मी गमावलेली नाही. आजही सर्वजण माझ्यासोबत आहेत'. ही पोस्ट पाहून लोक त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.

Saeeda Imtiaz

सईदा सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती. अशा परिस्थितीत तिची इन्स्टा स्टोरी अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. UAE मध्ये जन्मलेल्या सईदाने 'कप्तान', 'कुल्फी', 'वजूद' आणि 'रास्ता' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

तिचा 'थोडी सेटिंग थोडा प्यार' हा एक चित्रपट प्रदर्शित होणार होता. याशिवाय ही अभिनेत्री तेव्हा चर्चेत आली, जेव्हा तिने इंस्टाग्रामवर बिकिनी फोटो शेअर केले होते. या फोटोवरून तिला ट्रोलिंग सामोरे जावे लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT