pakya 
मनोरंजन

व्हॅलेंटाईनला तरी पक्या बोलेल का?

सकाळवृत्तसेवा

मुंबई : व्हॅलेंटाईन दिन जवळ येतोय आणि आमचा हिरो पक्याही त्याच्या प्रेयसीला प्रपोज करण्याची तयारी करतोय. त्याचे मित्र आणि सुहृद त्याला त्याच्या या प्रयत्नात मदत करण्यासाठी सरसावले आहेत. अशावेळी आपला पक्या हे पाऊल उचलण्याचे धाडस करेल?

हा ‘पक्या’ आहे ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटातील हिरो. त्याच्या या प्रपोजची तयारी त्याचा मित्रपरिवार कशी करत आहे, हे लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटातील त्याच्या या स्थितीचे यथायोग्य दर्शन घडविणारे आणि अत्यंत उत्साही असे हे गाणे सोमवारी 11 फेब्रुवारीला प्रदर्शित झाले. या चित्रपटाच्या माध्यमातून शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही जोडी प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे.

“बोल बोल पक्या, काहीतरी बोल पक्या...अरे भीड ना, अरे नड की, काहीतरी बोल पक्या...” अशा आशयाचे हे ‘वेडिंगचा शिनेमा’मधील गाणे खूपच धमाल आहे. या गाण्यात त्याच्या आजूबाजूचे सर्वच त्याला त्याच्या प्रेयसीला प्रपोज करण्याची गळ घालत आहेत. पक्याला मात्र परीला ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे,’ हे सांगण्याची हिंमत होत नाही. पक्याची नेमकी स्थिती आणि द्विधा मनस्थिती या गाण्यातून नेमकी मांडली आहे. हे गाणे शिवराज वायचळ, ऋचा इनामदार आणि प्रवीण तराडे यांच्यावर चित्रित झाले असून हे गाणे अवधूत गुप्ते यांनी गायले आहे.

या गाण्याच्या प्रदर्शानाआधी एक अत्यंत प्रभावी अशी सोशल मिडिया प्रसार मोहिम निर्मात्यांद्वारे चालविली गेली. त्यामुळे या चित्रपटाचा बोलबाला प्रेक्षकांमध्ये आधीच झाला आहे. पक्याला त्याच्या प्रपोज करण्याच्या कामगिरीवर धीर मिळावा म्हणून त्याला अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापासून, रणबीर सिंग ते अगदी आपल्या आसपासच्या सर्वसामन्यांचाही समावेश होता. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्यावर आता पक्याच्या प्रपोज करण्यावर बेतलेले संपूर्ण गाणेच प्रेक्षकांसमोर येत असून ते घराघरात आणि त्यातही युवकांमध्ये लोकप्रिय होईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

प्रख्यात संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट असून त्यांच्या या नव्या पर्वाची मराठी चित्रपटसृष्टीत सर्वांनाच उत्सुकता आहे. 12 एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची कथाही त्यांनीच लिहिली आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे तर नितीन वैद्य हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

शिवराज वायचळ, ऋचा इनामदार या नव्या जोडीचे चंदेरी पडद्यावरील पदार्पण या चित्रपटातून होत आहे. त्यांच्याशिवाय चित्रपटात मुक्ता बर्वे, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तराडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे आदींच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

Uttarakhand: बद्रीनाथमध्ये हंगामातील पहिला स्नोफॉल; आदि कैलाश यात्रा रोखली, दरडी कोसळल्याने रस्ते ठप्प

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर घणाघात

फुफ्फुसं आकुंचन पावतायत! धूम्रपानासोबत ‘या’ कारणांमुळेही वाढतो COPD चा धोका

SCROLL FOR NEXT