Palak Tiwari Breaks Silence On Ibrahim Ali Khan Dating Rumours, Says Hid Her Face From Shweta Tiwari Google
मनोरंजन

इब्राहिमसोबत गाडीत असताना पलकनं का लपवला होता चेहरा? कारण ऐकून बसेल धक्का

काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामुळे पलक आणि इब्राहिम एकमेकांना डेट करीत असल्याची अफवा पसरली होती.

प्रणाली मोरे

श्वेता तिवारी(Shweta Tiwari)ची लाडाची लेक पलक तिवारीनं(Palak Tiwari) खूप कमी वेळात एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत आपलं नाव कमावलं आहे. पलक तिवारी ग्लॅमरस आणि तिच्या बोल्ड लूकनी नेहमीच सोशल मीडियावर फोटोंच्या माध्यमातून कमाल दाखवत असते. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यामुळेच नाही तर सध्या तिची अधिक चर्चा रंगली आहे ती सैफ अली खान(Saif Ali Khan)चा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) सोबतच्या अफेअरच्या बातमीमुळे. आता यात किती खंर,किती खोटं देव जाणे.

काही दिवसांपूर्वी पलक तिवारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता,ज्यामध्ये ती इब्राहिम अली खानसोबत कारमध्ये बसलेली होती आणि पापाराझीनं त्यांना पाहिल्यावर त्यांच्यापासून तिनं चेहरा लपवण्याचा विचित्र प्रयत्न केलेला देखील दिसला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते दोघे रीलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चेला नुसता ऊत आला होता. आता पलकनं यावर खुलासा केला आहे. इब्राहिम आणि तिच्यात नेमकं काय नात आहे आणि दोघं एकमेकांसोबत कसा बॉन्ड शेअर करतात हे देखील तिनं सांगितलं आहे.

सिद्धार्थ कननसोबतच्या मुलाखती दरम्यान तिनं या गोष्टीचा खुलासा केला आहे. तिनं म्हटलंय,''इब्राहिम आणि मी चांगले मित्र आहोत. लोकं उगाचच आमच्या मैत्रीचा चुकीचा अर्थ काढत आहेत. त्यामुळेच मी यावर बोलणं पसंत केलं नाही. आम्ही फक्त बाहेर फिरायला गेलो होतो आणि पापाराझीनं कॅमेऱ्यात आम्हाला कॅप्चर केलं. सगळं तिथेच थांबलं असतं पण यावरनं उगाचच नको ते अर्थ काढले गेले''.

पलक पुढे म्हणाली,''आमच्या दोघांसोबत इतरही काहीजण होते. तिथे फक्त आम्हीच नव्हतो. पण ते चुकीच्या पद्धतीनं दाखवलं गेलं. कारण हे असंच सर्वांना आवडतं''. तिला जेव्हा विचारलं की.'' मग तू चेहरा का लपवला होतास?'' तेव्हा ती म्हणाली, ''मी माझी आई श्वेता तिवारीमुळे माझं तोंड लपवलं होतं,कारण तिला मी कुठे फिरायला जात आहे याविषयी खोटं बोलले होते. माझी आई पापाराझीच्या फोटोवरुन मी कुठे आहे हे बरोबर ट्रॅक करते. त्या रात्री मी आईला एक तास आधी फोन करुन बोलले होते की मी घरी येण्यासाठी निघाले आहे. मी बान्द्रयात होते. मी आईला म्हटलं होतं की,इथे खूप ट्रॅफिक आहे. मी रस्त्यात आहे. ज्यावर तिला काहीच अडचण नव्हती. आणि तेव्हाच ते फोटो समोर आले. जसे पापाराझी समोर आले तसं लगेच आईला मी कुठे आहे हे कळू नये म्हणून मी चेहरा लपवू लागले''. पण तेव्हाच माझ्या आईनं हे फोटो मला पाठवले आणि म्हणाली,''तू खोटारडी आहेस''.

पलकनं म्हटलंय तिनं चेहरा फक्त आई श्वेता तिवारीमुळं लपवला होता,यामागे अन्य कोणतंही कारण नव्हतं. तसंच इब्राहिमच्या बाबतीत पलक म्हणाली,''आम्ही चांगले मित्र आहोत. तो खुप छान मुलगा आहे. आम्ही एकमेकांशी कधीतरी बोलतो बस इतकंच''. पलकने या मुलाखतीत आपण 'सिंगल' असल्याचं देखील म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT