Palak Tiwari Esakal
मनोरंजन

Palak Tiwari:'सलमान असं काही बोललाच नाही', छोटे कपडे घालण्यावरच्या वक्तव्यावरुन पलक ने मारली पलटी म्हणाली,...

Vaishali Patil

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सध्या त्याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमानची मुख्य भुमिका असलेल्या या चित्रपटात त्याच्यासोबत पुजा हेगडे, शहनाज गील, पलक तिवारी या अभिनेत्रींही दिसणार आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही या चित्रपटातुन तिच्या तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करत आहेत. ती सलमानसोबत चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे.

दरम्यान प्रमोशन दरम्यान तिनं सांगतिलं की, सलमानने सर्व मुलींना सेटवर अंगभर कपडे परिधान करून येण्यास सांगितलं होतं. सेटवर मुलींच्या सुरक्षेसाठी सलमानने विशेष काळजी घेतली होती, असंही पलकने सांगितलं.

तिच्या या वक्तव्यानंतर सर्वत्र चर्चा सुरु झाली. त्यानंतर काहींनी सलमानला ट्रोलही केलं त्याचबरोबर सलमानची आधी सेट वर कसा असायचा याबद्दल बोललं गेलं.

सोशल मीडियावर तिच्या वक्तव्याची चर्चा सुरू होताच पलकने आता तिचं बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असल्याच बोललं. काहीतरी गैरसमज झाल्याचं म्हणत तिनं आता यावर पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे.

पलक तिवारी म्हणाली की, 'खरं तर काही तरी गैरसमज झाला आहे. मला एवढेच सांगायचं होतं की, माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या सिनिअर लोकांसमोर कसे कपडे घालायचे यासाठी मी स्वतःचं नियम बनवला आहेत. सलमान सर त्यापैकीच एक. पण चर्चा होत असल्याने मी काहीही बोललो नाही. मात्र जशी चर्चा होत आहे तसं मी काहीही बोललेली नाही. '

‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, भूमिका चावला, व्यंकटेश डग्गुबती, जगपती बाबू, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल यांच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

MI vs RCB: मुंबई इंडियन्स संघात दोन मोठे बदल, बंगळुरूने हेजलवूडला संघातून काढलं; पाहा Playing XI

Pune fraud crime News: दैवी शक्तीचे आमिष दाखवून भोंदूकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; ५० लाखांची फसवणूक, स्वारगेट पोलिसांत गुन्हा

Pune Loni Kalbhor fraud case: बॉटलिंग प्लान्ट भागीदारीच्या आमिषाने २ कोटी ३४ लाखांची फसवणूक; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक, एक फरार

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT