Palak Tiwari, Shweta Tiwari Esakal
मनोरंजन

Palak Tiwari: आईनं छोटा पडदा गाजवलाय..पण पलकला मात्र टी.व्ही पासून एक हात लांबच रहायचंय..कारण सांगत केला खुलासा

श्वेता तिवारीची मोठी मुलगी पलक तिवारी सलमानच्या 'किसी का भाई,किसी की जान' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

प्रणाली मोरे

Palak Tiwari: सलमान खानचा सिनेमा 'किसी का भाई किसी की जान' मधून बॉलीवू़डमध्ये पदार्पण करणारी पलक तिवारी सध्या चर्चेत आहे. तिच्याविषयी सध्या हा प्रश्न जोरदार चर्चेत आहे तो म्हणजे हिची आई श्वेता तिवारी टी.व्ही वरची प्रसिद्ध अभिनेत्री असूनही तिनं मात्र बॉलीवूडची वाट का पकडली,छोट्या पडद्याकडे करिअर म्हणून सुरवातीला का पाहिलं नाही?,

याचं उत्तर स्वतः पलकनं एका मुलाखतीत दिलं आहे. ती म्हणाली की,''टी.व्ही इंडस्ट्रीत ती आपल्या आईमुळे गेली नाही. ती म्हणाली की,तिथे जे काही मी केलं असतं,ते सगळं माझ्या आईनं वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून याआधीच केलं आहे..किंबहुना तिनं त्याहून अधिक केलं आहे. मी तिकडे गेले असते तर तिच्यासोबत माझी तुलना झाली असती आणि ते टाळणं असंभव होतं''.(Palak Tiwari did not explore tv to avoid comparisions with mother)

पलक पुढे म्हणाली, ''म्हणून मग मी विचार केला की जे आईनं केलं आहे आणि त्यात तिनं उल्लेखनीय यश मिळवलं आहे,मी त्यापेक्षा वेगळं करेन''.

पलक पुढे म्हणाली, ''मला लहानपणी वाटायचं माझ्या सगळ्या फ्रेन्ड्सच्या आई टी.व्हीवर दिसतात,मी त्यांना विचारायची की तुमच्या आई टी.व्ही वर कोणत्या वेळेत दिसतात?''

पलकनं चंदेरी पडद्यावर पदार्पण करण्याआधी 'अंतिम' सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

पलकनं ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की,''मी टी.व्ही विषयी कधीच नकारात्मक काही बोलायची हिम्मत करूच शकत नाही कारण माझ्या आयुष्यात आज जे काही आहे, मी जे काही आहे...घर..गाडी...शिक्षण..पैसा हे सगळं टी.व्हीमुळे आहे. या माध्यमानं आम्हाला खूपकाही दिलं आहे''.

अभिनेत्री म्हणून पलकचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमान पहिला सिनेमा आहे. हा २१ एप्रिल रोजी रिलीज होत आहे. यामध्ये सलमान खान व्यतिरिक्त पूजा हेगडे,जरपति बाबू, भूमिका चावला,विजेंद्र सिंग,राघव जुयाल आणि शहनाझ गिल देखील आहेत.

काही दिवसांपूर्वी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता,ज्यामध्ये पलकच्या अनुपस्थितीविषयी जेव्हा तिला प्रश्न विचारला गेला तेव्हा तिनं म्हटलं की, ''लोकं मला पहायलाच उत्सुक आहेत याविषयी मला कोणताही भ्रम नाही''.

ती म्हणाली की, ''सलमान खानचा सिनेमा आहे हा त्यामुळे मी असले किंवा नसले याच्याशी कोणाला काही घेणं देणं नाही''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : भारतीय संघात राहायचा असेल तर... Rohit Sharma, विराट कोहली यांच्यासमोर अजित आगरकरने ठेवली अट

OBC leaders ultimatum : ‘’२ सप्टेंबरचा जीआर रद्द करा, श्वेतपत्रिका काढा’’ ; ओबीसी नेत्यांची सरकारला सहा दिवसांची मुदत!

IND vs AUS Full Schedule: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक ! वाचा कधी, कुठे, केव्हा खेळणार; वेळ व Live Telecast

ग्लोबल स्टार राम चरण याच्या हस्ते आर्चरी प्रीमियर लीगचा दणदणीत शुभारंभ

Hill Station Travel Tips: पहिल्यांदाच हिल स्टेशनला जाताय? मग ट्रॅव्हल बॅगमध्ये नक्की पॅक करा 'या' महत्वाच्या वस्तू

SCROLL FOR NEXT