Actress Pallavi Joshi -The Kashmir Files Movie Google
मनोरंजन

The Kashmir Files:'भारताविरोधात माझी भूमिका,तिरस्कार करा'-पल्लवी जोशी

The Kashmir Files सिनेमातील आपल्या भूमिकेविषयी पल्लवी जोशीनं मोठा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

11 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झालेली 'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files) हा सिनेमा आपलं सत्य घटनेवर आधारित कथानक आणि व्यक्तिरेखांमुळे चांगलाच चर्चेत आहे. क्लासपासून मासपर्यंत अनेकांनी सिनेमाला पसंतीची पोचपावती दिली आहे. पण आता सिनेमातील महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री पल्लवी जोशी आपल्या व्यक्तिरेखेला घेऊन मोठं वक्त्व्य केलं आहे. ती म्हणाली,''भारतातील सगळ्या नागरिकांनी सिनेमातील माझ्या व्यक्तिरेखेचा तिरस्कार करायला हवा''. पल्लवी जोशी असं का म्हणाली असेल? काय रहस्य दडलंय या व्यक्तिरेखेत? 'द काश्मिर फाईल्स' सिनेमात पल्लवी जोशीनं जेएनयू प्रोफेसर राधिका मेननची भूमिका साकारली आहे. जी काश्मिरी विद्यार्थ्यांना स्वतंत्र काश्मिरच्या लढ्यासाठी प्रवृत्त करत आहे.

पल्लवीला ही व्यक्तिरेखा साकारण्यामागचं कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली,''जेव्हा मी काश्मिर पंडितांशी त्यांच्यावर झालेल्या त्या अन्याया संदर्भात बोलत होते ,तेव्हा मी त्या खलनायकाला जास्त जवळून अनुभवलं. ते माझ्याकडं पाहून त्यांच्या मनातला तो द्वेष सांगत होते,जणू ते माझ्यात तो खलनायक पाहतायत असं काही क्षण मला वाटून गेलं. आणि मग मी ठरवलं मी या सिनेमातील ती प्रोफेसरची भूमिक करणार आणि जय्यत तयारीनीशी या व्यक्तिरेखेला लोकांसमोर ठेवण्यासाठी मी सज्ज झाले. मला ती इतकी उत्तम वठवायची होती की प्रत्येक भारतीयांना त्या व्यक्तीरेखेचा तिरस्कार करायलाच हवा''.

सिनेमा प्रदर्शनानंतर चर्चेचा एक सूर छेडला जात आहे की पल्लवी जोशीची 'द काश्मिर फाईल्स' सिनेमातील ही विचित्र भूमिका बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका अरुंधती रॉय याच्यापासनं प्रेरित आहे. जी सिनेमात सांगतेय की,''काश्मिर कधीच भारताचा भाग नव्हता,हे एक ऐतिहासिक सत्य आहे. जर भारतानं स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरोधात युद्ध पुकारलं तर मग काश्मिर भारताविरोधात का नाही जाऊ शकत?''

पल्लवी जोशी यांची भूमिका विश्वविद्यलयाविरोधात भाष्य करणारी आहे अशी चर्चाही होतेय. पण त्यावर सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी यावर स्पष्टिकरण देताना सांगितलं आहे की,यावर रीसर्च करा,गूगलवर माहिती मिळवा,सर्वांना आपलं उत्तर मिळून जाईल. पल्लवी जोशी व्यतिरिक्त द काश्मिर फाईल्स सिनेमात अनुपम खेर,मिथुन चक्रवर्ती,दर्शन कुमार यांनीही महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओ,तेज नारायण अग्रवाल,आई.एम.बुद्ध आणि अभिषेक अग्रवाल आर्ट्स बॅनर अंतर्गत करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain News: पोलिसांच्या धाडसी कृतीचे कौतुक! शाळेची बस पाण्यात अडकली अन्...; विद्यार्थ्यांच्या थरारक सुटकेचा व्हिडिओ व्हायरल

Santosh Deshmukh Case: ''उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, यांना पदावर ठेऊ नका'', धनंजय देशमुखांची अजित पवारांना विनवणी

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Latest Marathi News Live Updates: १४ गावातील रेल्वेचा बोगद्यात साचले पाणी

SCROLL FOR NEXT