Amazon Prime Video esakal
मनोरंजन

Amazon Prime Video: 'मिर्झापूर' आणि 'पंचायत'चा नवा सीझन येणार प्रेक्षकांच्या भेटीला; प्राइम व्हिडीओने केली आगामी चित्रपट आणि वेब सीरिजची घोषणा

Movies And Web Series: अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने त्यांच्या आगामी चित्रपट आणि वेब सीरिजची केली आहे, ज्यामध्ये बहुप्रतिक्षित मिर्झापूर आणि पंचायत या वेब सीरिजच्या आगामी सीझनचा समावेश आहे.

priyanka kulkarni

Amazon Prime Video: प्रेक्षकांना या वर्षी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) वर मनोरंजनाचा डोस मिळणार आहे. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मने मोठी घोषणा केली आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मने त्यांच्या नवीन चित्रपट आणि वेब सीरिजची केली आहे, ज्यामध्ये बहुप्रतिक्षित मिर्झापूर आणि पंचायत या वेब सीरिजच्या आगामी सीझनचा देखील समावेश आहे.

काल (19 मार्च) मुंबईत प्राइम व्हिडीओचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्राइम व्हिडीओनं त्यांच्या आगामी वेब सीरिज आणि चित्रपटांची घोषणा केली.

जाणून घेऊयात अॅमेझॉन प्राइमच्या आगामी वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल-

ऐ वतन मेरे वतन

बी हॅप्पी

सिटाडेल: हनी बनी

गँग्स कुरुथी पुनाल

सुपरमॅन ऑफ मालेगांव

दिल दोस्ती डिलेम्मा

अंधेरा

ख़ौफ़

इंस्पेक्टर ऋषी

स्नेक अँड लॅडर्स

छोरी 2

कॉल मी बे

द मेहता बॉइज

द ट्रइब

दुपहिया

जिद्दी गर्ल्स

इत ट्रान्सीट

बँडवाले

वॅक गर्ल्स

मिर्झापूर S3

पाताल लोक S2

पंचायत S3

सुझल -2

बंदिश बँडिट्स S2

फॉलो करलो यार

दज राना कनेक्शन

रंगीन

मटका किंग

दलदल

डॅरिंग पार्टनर्स

द ग्रेट इंडियन कोड

सुभेदार

Arabia Kadali

थलवेट्टियां पलायम

Fallout

'मिर्झापूर' आणि 'पंचायत' या वेब सीरिजच्या दोन सिझन्सला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

मिर्झापूर-3 चा फर्स्ट लूक आऊट

मिर्झापूर या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, विजय वर्मा, हर्षिता गौर, अंजुम्म शर्मा, प्रियांशू पैन्युली, शीबा चढ्ढा, राजेश तैलंग, मनुषी चढ्ढा, ईशा तलवार हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या वेब सीरिजचा फर्स्ट लूक देखील रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये खुर्चीला आग लागली आहे, असं दिसत आहे. अॅमेझॉन प्राइमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मिर्झापूर वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनचं पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. या पोस्टरला कॅप्शन देण्यात आलं, "गुड्डू आणि गोलू यांनी सिंहासनावर दावा केला त्यानंतर आता ते खुर्चीच्या आणखी एका दावेदाराविरुद्ध लढणार आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation Protest : मनोज जरांगेंना एकच दिवस परवानगी मिळालीय, सरकार काय करणार? एकनाथ शिंदे म्हणाले, ''आम्ही....''

PCMC News : काळेवाडी भुयारी मार्गातील अस्वच्छता आणि असुरक्षा; महिलांची सुरक्षा धोक्यात

Manoj Jarange News: भीम आर्मीचा मराठा आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा

Himachal Flood: जोर ओसरूनही जनजीवन विस्कळित; हिमाचलमध्ये रावी नदीला अचानक पूर, वाराणसीत गंगाआरतीला अडथळा

Gauri festival : गणेशोत्सवानंतर आता गौराईंची तयारी; कापडी फुलांसह ज्वेलरी सेट खरेदीसाठी बाजारात गर्दी

SCROLL FOR NEXT