Panipat movie is tax free in Maharastra now 
मनोरंजन

'पानिपत' महाराष्ट्रात बघा आता टॅक्स फ्री!

वृत्तसंस्था

मुंबई : सदाशिवरावभाऊ पेशव्यांचा पराक्रम सांगणारा भव्यदिव्य पडद्यावरील 'पानिपत' हा चित्रपट महाराष्ट्र सरकारने टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे पानिपतचे दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी मुख्यमत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत.

ऐतिहासिक घटनांची सध्याच्या पिढीला नव्याने ओळख व उजळणी व्हावी यासाठी असे चित्रपट महत्त्वाचे असतात. पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचे चित्र उभे करणारा हा चित्रपट मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पेशव्यांचा या युद्धात पराभव झाला होता, तरीही त्या पराभवाच्या आठवणी आजही प्रत्येक मराठी मनात आहेत. अर्जून कपूर, कृती सेनन, मोहनीश बेहल यांच्या मुख्य भूमिका असलेला पानिपत बॉक्स ऑफिसवरही चांगलाच गाजला.

हा चित्रपट महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रेक्षकांनी पहावा, मराठ्यांच्या साम्राज्याचा पराक्रम सर्वांना कळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. 6 डिसेंबरला रिलीज झालेला हा चित्रपट आता महाराष्ट्रात स्वस्त दरात बघता येईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Marathi News Live Updates : संजय राऊत यांचा 'वंदे मातरम्' वरुन सरकारवर निशाणा

घरी नणंदेसोबत कशी वागते करीना कपूर? सैफ अली खानच्या बहिणीने सांगितली आतली गोष्ट; म्हणाली- ती नाटकी...

Numerology Success After 35 : 'या' मूलांकाच्या लोकांना उशिरा मिळते यश; आधी करावा लागतो संघर्ष, पण वयाच्या पस्तीशी-चाळीशीनंतर बदलते नशीब

Aditya Thackeray: राज्यातील उद्योगांची स्थिती बिकट, ३५ हजार उद्योग बंद, रोजगारावर गंभीर परिणाम; आदित्य ठाकरेंचे आरोप

SCROLL FOR NEXT