Pankaj Tripathi Actor Father Pandit Banaras Passed away age 98 Years SAKAL
मनोरंजन

Pankaj Tripathi Father Death: पंकज त्रिपाठीच्या वडीलांचे निधन, अभिनेत्याच्या परिवारावर शोककळा

पंकज त्रिपाठी वडिलांच्या खूप जवळचे होते

Devendra Jadhav

Pankaj Tripathi Father Passed Away News: सध्या 'OMG 2' मुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असणारा पंकज त्रिपाठी यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठींचे वडील पंडित बनारस तिवारी यांचे निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते.

त्यांच्या मूळ गावी बेलसंड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज त्रिपाठी वडिलांच्या खूप जवळचे होते. वडिलांच्या जाण्याने त्यांना खूप दुःखी झालं आहे.

(Pankaj Tripathi Actor Father Pandit Banaras Passed away age 98 Years)

पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन नेमके कोणत्या आजाराने झाले की वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं, हे सध्यातरी कळू शकलेले नाही. दरम्यान पंकज यांचे चाहते मात्र त्यांच्यावर असलेलं वडीलांचं छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त करत आहेत.

वडिलांना पंकज त्रिपाठीच्या कामाची माहिती नव्हती

पंकज त्रिपाठी हे बिहारमधील गोपालगंज भागातील रहिवासी आहे. अभिनेता करिअरच्या निमित्ताने मुंबईत राहत असताना वडील आणि आई गावात राहत होते. 'मॅशेबल'शी संवाद साधताना पंकज त्रिपाठीने एकदा सांगितले की, "मुलगा काय करतो, कुठे काम करतो अशा गोष्टींमध्ये पंकजच्या वडिलांना अजिबात रस नव्हता. याशिवाय मुलगा पंकज त्रिपाठी चित्रपटसृष्टीत काय काम करतो हेही त्यांना माहीत नव्हते."

पंकज त्रिपाठीचे वडील एकदाच मुंबईत आले, कधीच थिएटरला गेले नाहीत

पंकज त्रिपाठी यांनी मिडीयाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "त्यांचे वडील एकदाच मुंबईत आले होते. इथली मोठमोठी घरं आणि इमारती त्यांनाआवडत नव्हत्या. पंकज त्रिपाठी यांनी सांगितले होते की त्यांचे वडील कधीही चित्रपटगृहात चित्रपट पाहायला गेले नाहीत. घरातही ते आपल्या मुलाचे सिनेमे टीव्ही किंवा कॉम्प्युटरवर कुणी दाखवले तरच बघायचे. काही वर्षांपुर्वीच पंकज त्रिपाठीने आई आणि वडिलांसाठी टीव्ही सेट लावला होता. एकुणच एकीकडे OMG 2 चं यश साजरं करत असतानाच पंकज त्रिपाठींना व्ययक्तिक आयुष्यातील या दुःखद गोष्टींना सामोरं जावं लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: मनीषा मांढरेच्या लॉकरमध्ये सापडल्या जुन्या प्रश्नपत्रिका; सीबीआयचे अधिकारी पुण्यात तळ ठोकून

Jal Jeevan Mission Takali Rajerai: मनसेच्या आक्रमक भूमिकेला यश; टाकळी राजेरायच्या सकसआहार वस्तीस जलजीवन मिशनमधून पाणीपुरवठा सुरू करण्याची हालचाल

Latest Marathi News Live Update : दिल्लीत २०२६ मधील विजेच्या मागणीचा उच्चांक नोंदवला गेला

KKR vs MI Live: स्वाभिमानासाठी खेळणार? रवी शास्त्रींच्या प्रश्नावर हार्दिक पांड्याचं उत्तर Viral अन् मुंबईने ९ चेंडूंत गमावल्या ३ विकेट्स...

Ashadhi Wari Sant Eknath Palanquin: अधिकमासामुळे संत एकनाथ महाराज पायी दिंडी वारीचे प्रस्थान एक महिना उशिरा; पैठणहून ७ जुलैला पंढरपूरकडे पालखी रवाना

SCROLL FOR NEXT