pankaj tripathi did hard work for the role of atal bihari vajpayee eating khichdi during shooting SAKAL
मनोरंजन

Pankaj Tripathi: "60 दिवस फक्त खिचडी खाऊन...", वाजपेयींच्या भुमिकेसाठी पंकज त्रिपाठींनी घेतली कठोर मेहनत

पंकज त्रिपाठींनी अटलजींच्या भुमिकेसाठी कठोर मेहनत घेतलीय, वाचा सविस्तर

Devendra Jadhav

Main Atal Hoon Pankaj Tripathi News: पंकज त्रिपाठी हे बॉलिवुडमधील लोकप्रिय अभिनेते. पंकज यांनी आजवर सिनेमांमधून लक्षवेधी भुमिका केल्या. पंकज यांनी काहीच दिवसांपुर्वी रिलीज झालेल्या OMG 2 मधील भुमिकेतुन सर्वांचं मन जिंकलं.

अलीकडेच लल्लनटाप या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पंकज यांनी एक मोठा खुलासा केलाय. पंकज यांनी काहीच दिवसांपुर्वी मै हू अटल या सिनेमाचं शुटींग संपवलं. या सिनेमाच्या शुटींगवेळी पंकज यांनी काय मेहनत केली, याचा त्यांनी खुलासा केलाय.

लल्लनटापला दिलेल्या मुलाखतीत पंकज यांनी अटल यांच्या भुमिकेसाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा खुलासा केला. पंकज यांनी सांगितले की, अटल सिनेमाचं शुटींग करताना मी फक्त खिचडी खालली. ही खिचजी मी स्वतःच्या हाताने बनवायचो.

दुसऱ्याने जेवण कसं बनवलं याचा तुम्ही कधीच अंदाज लावु शकत नाही. मी तेल आणि मसाल्याशिवाय खिचडी बनवायचो. मी साधी डाळ, तांदूळ आणि स्थानिक भाज्या एकत्र करून खिचडी बनवायचो.

पंकज त्रिपाठी पुढे सांगतात की, 'मैं अटल हूं' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिवंगत पंतप्रधानांची व्यक्तिरेखा पडद्यावर अधिक चांगल्या पद्धतीने साकारता यावी, यासाठी त्यांनी आहारात बदल केला.

पंकज म्हणाले, "मी लहान होतो तेव्हा समोसा खाऊनही अभिनय करू शकत होतो, पण आज आठवत नाही की मी शेवटचा समोसा कधी खाल्ला होता? आता मी स्वतःला फिट अँड फाईन ठेवण्यासाठी सात्विक आहार घेतो."

पंकज त्रिपाठी यांनी सकस आहाराचे महत्त्व सांगितले. पंकज म्हणाले की, "सकस आहार घेणँ हे केवळ आरोग्यासाठीच आवश्यक नाही, तर अभिनेत्याला त्याची व्यक्तिरेखा चांगल्या प्रकारे वठवण्यासही यामुळे मदत होते."

पंकज शेवटी म्हणतात, "खराब अन्न खाणे आणि पोट खराब होणे अशा गोष्टींमुळे एखाद्या अभिनेत्याला त्याच्या अभिनय प्रभावीपणे व्यक्त करण्यात अडथळा येतो."

अशाप्रकारे अटल वाजपेयींसारखी महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी पंकज यांनी फक्त खिचडी खाल्ली. जेणेकरून त्यांना अटलजींची व्यक्तिरेखा अधिक चांगल्या प्रकारे साकारायला मदत होईल. मै हू अटल सिनेमा २५ डिसेंबर २०२३ ला रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT