Pankaj Tripathi Dedicates His First National Award Win To Late Father: Esakal
मनोरंजन

Pankaj Tripathi: 'मी आज जो..', पंकज त्रिपाठींनी दिवंगत वडिलांना केला पुरस्कार समर्पित!

बॉलीवूड अभिनेता पंकज त्रिपाठीने राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर तो वडिलांना समर्पित केला.

Vaishali Patil

Pankaj Tripathi Dedicates His First National Award Win To Late Father: 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली आहे. यात दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनने बाजी मारली. त्याला 'पुष्पा' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला , तर गंगूबाई काठियावाडी साठी आलिया भट्ट आणि मिमी या चित्रपटांसाठी क्रिती सेनन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.

तसेच, दक्षिणेतील ब्लॉकबस्टर चित्रपट RRR ने एकूण 6 श्रेणीत पुरस्कार मिळाले. ज्येष्ठ अभिनेते पंकज त्रिपाठी यांचाही जलवा 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2003' मध्ये पाहायला मिळाला. 'मिमी' चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपाटातील त्याची भुमिका सहाय्यक जरी असली तरी ती खुप महत्वपुर्ण होती. या चित्रपटात त्यांनी टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारली होती. आता पुरस्कार जिंकल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुरस्कार मिळवल्यानंतर आता पंकज त्रिपाठी यांनी त्याच्या हा विजय त्याचे वडिल पंडित बनारस तिवारी यांना समर्पित केला. विजयाचे श्रेय वडिलांना देत पंकज त्रिपाठी यांनी अतिशय भावूक वक्तव्य केलं.

अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या टीमने अधिकृत निवेदन जारी करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. या आनंदाच्या क्षणी पंकज त्रिपाठी यांना त्यांच्या वडिलांची आठवण झाली आहे. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला. काही दिवसांपूर्वी निधन झाले.

या पुरस्काराबद्दल बोलतांना पंकज म्हणाले की, "दुर्दैवाने, हा माझ्यासाठी खुप दुःखाचा काळ आहे. बाबूजी माझ्या सोबत असते तर त्यांना खुपच आनंद झाला असता. जेव्हा मला पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्काराचा मिळाल्याचं कळालं तेव्हा त्याचा खूप अभिमान आणि आनंद झाला.

दिवंगत वडिलांच्या आशीर्वादानेच त्यांनी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले. असं म्हणत त्यांनी हा पुरस्कार वडिलांना समर्पित केला. त्यांच्या टिमचे आभार मानले आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी क्रितीचे देखील अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Jayden Adams: वर्ल्डकप फुटबॉलमध्ये खेळलेल्या २५वर्षीय आफ्रिका खेळाडूचे निधन

Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

Latest Marathi News Update : आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

Pimpri: विनापरवाना उभारली तीनमजली इमारत; मोशीतील बांधकामाबाबत अनेक प्रश्न, जबाबदारी कोणावर?

SCROLL FOR NEXT