Pankaj Udhas Anup Jalota Post  eskal
मनोरंजन

Pankaj Udhas Death: कोणत्या आजारानं झाला गझल सम्राट पंकज उधास यांचा मृत्यू? अनुप जलोटांनी केला खुलासा!

गझल सम्राट पंकज उधास (Pankaj Udhas Death News) यांचे मित्र गायक अनुप जलोटा यांची पोस्ट व्हायरल होत आहे.

युगंधर ताजणे

Pankaj Udhas Death News: गझल सम्राट पंकज उधास यांनी काल मुंबईतील एका खासगी रुग्णालयात (pankaj udhas death latest news) अखेरचा श्वास घेतला. ते ७२ वर्षांचे होते. तब्बल चार दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीनं चाहत्यांना जिंकून घेतले होते. बॉलीवूडमधील प्रसिद्ध, लोकप्रिय गायक म्हणून ते अनेकांना परिचित होते.

पंकज उधास यांच्या जाण्यानं बॉलीवूडसह त्यांच्या लाखो चाहत्यांना मोठा (Pankaj Udhas Death) धक्का बसला आहे. केवळ गझलच नाही तर सुगम संगीतामधून त्यांनी चाहत्यांना अनवट सुरावटींचा आनंद दिला. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह बॉलीवूडमधील दिग्गज सेलिब्रेटींनी उधास यांना आदरांजली वाहिली आहे.

आता पंकज उधास यांचे जीवलग मित्र ख्यातनाम गायक अनुप जलोटा (Pankaj Udhas Friend Anup Jalota) यांनी एक पोस्ट शेयर करुन उधास यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट केले आहे. जलोटा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्या व्यक्तीनं त्याच्या आयुष्यात कित्येक कॅन्सर रुग्णांना खूप मदत केली त्याचा मृत्यूही कॅन्सर सारख्या आजारानं झाला. त्यांना पॅनक्रेटिक कॅन्सर (Ghazal Maestro Battled Pancreatic Cancer) झाला होता. मला गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून त्याविषयी माहिती होतं. इंडिया डॉट कॉमनं याबाबत वृत्त दिलं आहे.

पंकज उधास यांनी देखील माझ्याशी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून संवाद साधला नव्हता. मला असे वाटले होते की, त्यांची प्रकृती ठिक नसेल, आता जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी ऐकली तेव्हा खूप मोठा धक्काच (Pankaj Udhas song) बसला. पंकजच्या निमित्तानं मी खूप जवळचा मित्र गमावला आहे. तो एक गायक आणि व्यक्ती म्हणून फारच प्रेमळ होता. मदतशील होता.

पंकज उधास यांची मुलगी नायाब उधास (Pankaj Udhas Daughter Nyaab Udhas) यांनी काल सोशल मीडियावर पंकज उधास यांच्या निधनाविषयी बातमी दिली होती. यानंतर बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी उधास यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या गोड आवाजासाठी ओळखल्या गेलेल्या उधास यांचा चाहतावर्ग केवळ भारतच नाही तर जगाच्या पाठीवरील वेगवेगळ्या देशांमध्ये आहे. ८० ते ९० च्या दशकांत त्यांच्या गझल आणि हिंदी चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT