Pankhuri-Gautam Blessed With Twins Esakal
मनोरंजन

Pankhuri-Gautam Blessed With Twins: गौतम-पंखुरीची गोड बातमी! जुळ्या बाळाचं स्वागत

Vaishali Patil

Pankhuri-Gautam Blessed With Twins: टीव्हीवरील लोकप्रिय जोडपे गौतम रोडे आणि अभिनेत्री पंखुरी अवस्थी यांनी चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. गौतम आणि पंखुरी आई-वडील झाले आहेत.

गौतम रोडे आणि पंखुरी अवस्थी हे टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडपे आहेत. त्याच्या घरी आता आनंदाचं वातावरण आहे. गौतम आणि पंखुरी यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे.

बुधवारी सकाळी यादोघांनी ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली. तेव्हापासून सर्व सेलेब्स आणि चाहते पंखुरी आणि गौतमला दोन नवीन छोटे पाहुणे आल्याच्या शुभेच्छा देत आहेत

गौतमने याबाबत पोस्ट शेयर केली होती. यात ट्वाईस ब्लेस्ड. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाल्याचे सांगितले. 25 जुलैला पंखुरीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.

(marathi News)

जोडप्याने एका दिवसानंतर ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे. पोस्टमध्ये जोडप्याने पुढे लिहिले की, हृदय आनंदाने आणि कृतज्ञतेने भरले आहे. त्यांच्या चार जणांच्या कुटुंबाचा प्रवास आता सुरु झाला आहे. याशिवाय त्यांनी सर्वांचे प्रेम आणि आशीर्वादाबद्दल आभारही मानले आहेत.

पंखुरी अवस्थी आणि गौतम रोडे लग्नाच्या पाच वर्षानंतर आई-वडील झाले आहेत. एका शोच्या सेटवरच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. एकाच शोमध्ये काम करत असताना दोघांची जवळिक वाढली डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. पंखुरी अवस्थी आणि गौतम रोडे 5 फेब्रुवारी 2018 रोजी विवाहबंधनात अडकले. त्यानंतर या वर्षी 6 एप्रिल रोजी दोघांनीही पालक होणार अशी घोषणा केली होती.

पंखुरीने 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'मॅडम सर' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तर गौतम हा सरसस्वती चंद्र आणि बऱ्याच मालिकांसाठी लोकप्रिय आहे. त्याने चित्रपटात देखील अभिनय केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devkund Waterfall: देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडाले; सोमवारी सकाळी शोधकार्य सुरु होणार

Abhishek Sharma: भारत हरला, पण अभिषेक शर्माने रचला इतिहास! 'हा' खास विक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

SCROLL FOR NEXT