paras mahira 
मनोरंजन

'बिग बॉस' फेम पारस छाब्राने माहिराला केलं ऑनकॅमेरा प्रपोज? 'या' व्हिडिओमुळे आहेत दोघं चर्चेत..

दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- 'बिग बॉस १३' चे स्पर्धक पारस छाब्रा आणि माहिरा शर्मा नेहमीच त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. बिग बॉसचा सिझन संपल्यानंतरही दोघं अनेकदा एकमेकांसोबत दिसून आले आहेत. पारस आणि माहिराने त्यांच्या नात्याविषयी अजुन मिडियासमोर काही खुलासा केला नसला तरी दोघांचे व्हिडिओ चर्चेत येण्यासारखेच असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय.

सोशल मिडियावर पारस आणि माहिरा त्यांच्या एका रोमँटिक व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. दोघांचा लूक जबरदस्त दिसतोय. या व्हिडिओमध्ये पारस छाब्रा गुडघ्यावर बसून माहिराच्या बोटात अंगठी घालताना दिसतोय. व्हिडिओमध्ये पारसला हे करताना पाहून माहिरा लाजते आणि मग तिचा हात पुढे करते.  आता पारसने खरंच तिला अंगठी घालून प्रपोज केलं आहे की मग हा व्हिडिओ कोणत्यातरी प्रोजेक्टचा भाग आहे हे मात्र अजून कळू शकलेलं नाही. मात्र सोशल मिडियावर हा रोमँटीक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर माहिरा शर्माच्या फॅन क्लबच्या अकाऊंट वरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ माहिरा आणि पारसच्या चाहत्यांना चांगलाच पसंत पडतोय. इतकंच नाही तर चाहते कमेंट करुन त्यांना उत्तर देखील देत आहेत. या व्हिडिओसोबतंच या फॅनपेजवर त्यांच्या याच लोकेशनवरचे आणि याच गेटमधले आणखी दोन व्हिडिओही दिसून येत आहेत. या व्हिडिओंमध्येही पारस-माहिराचा जबरदस्त रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय.

'बिग बॉस'च्या घरात पारस आणि माहिरामध्ये जास्त जवळीक पाहायला मिळाली होती. परिणामी पारसची गर्लफ्रेंड आकांक्षा पुरी आणि पारसंच ब्रेकअप देखील झालं. यानंतर आकांक्षाने पारसच्या बाबतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. तर पारसच्या म्हणण्यानुसार त्याने बिग बॉसच्या घरात जाताना ठरवलं होतं की शो संपल्यानंतर तो आकांक्षासोबत ब्रेकअप करेल आणि अगदी झालंही तसंच.  

paras chhabra and mahira sharma romantic video goes viral  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT