Paresh Rawal Esakal
मनोरंजन

Paresh Rawal: बंगाल्यांना नडले, परेश रावल रडले! अखेर उच्च न्यायालयानं दिला दिलासा

गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान बंगाली लोकांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेले भाजप नेते आणि अभिनेते परेश रावल यांना सोमवारी कोलकाता उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला.

सकाळ डिजिटल टीम

ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांचे ‘बंगालींसाठी मासे शिजवा’ हे वादग्रस्त विधान त्यांना चांगलेच भोवले होतं. हे विधान सोशल मीडियावर इतकं गाजलं. सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या विधानामुळे लोकांच्या भावना दुखावल्याने आणि राजकीय व्यासपीठावरून चिथावणीखोर भाष्य केल्याने परेश रावला यांना कोलकाता पोलिसांनी समन्स बजावले होतं.परेश रावल यांनी टाळले होते.

त्याविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावत तलताळा पोलीस ठाण्याच्या हजर राहण्याच्या नोटीसला आव्हान दिले. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने त्याच्यावर दाखल झालेला गुन्हा फेटाळून लावला आहे. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने त्याच्यावर दाखल झालेला गुन्हा फेटाळून लावला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान एका जाहीर सभेला संबोधित करताना परेश रावल म्हणाले होते, 'गॅस सिलिंडर महाग आहेत, पण त्यांची किंमत कमी होईल. लोकांना रोजगार मिळेल, गुजरातमध्ये राहणारे लोक महागाई सहन करतील, पण शेजारच्या घरात रोहिंग्या निर्वासित किंवा बांगलादेशी आले तर ते गॅस सिलिंडरचे काय करणार? बंगालींसाठी मासे शिजवणार का?' या विधानामुळे चांगलेच अडचणीत सापडले होते. परेश रावल यांच्या वक्तव्यावर अनेक पक्षांच्या नेत्यांनी टीका केली होती.

दरम्यान परेश रावल यांना आज दुसरीही आंनदाची बातमी मिळाली आहे. ती म्हणजे 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परेश रावल यांच्या 'द स्टोरीटेलर' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. हा जिओ स्टुडिओचा चित्रपट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT