paresh rawal 
मनोरंजन

लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर परेश रावल यांना कोरोना

स्वाती वेमूल

ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी रात्री ट्विट करत त्यांनी चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. परेश रावल यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. 'दुर्दैवाने, मला कोरोनाची लागण झाली असून गेल्या दहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया कोरोना चाचणी करून घ्यावी', असं ट्विट त्यांनी केलं. अनुपम खेर, रणवीर शौरी, राहुल ढोलकिया यांसह अनेक कलाकारांनी परेश रावल यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. राज्यात कोरोना प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढत असून याआधी आमिर खान, आर. माधवन, कार्तिक आर्यन, मनोज वाजपेयी, सतीश कौशिक, रोहित सराफ या कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 

९ मार्च रोजी परेश रावल यांनी लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यावेळी फोटो पोस्ट करत त्यांनी याबद्दल ट्विटरवर सांगितलं होतं. आता पहिला डोस घेतल्यानंतर १८ दिवसांतच त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना महासाथीची दुसरी लाट आली असून दररोज बाधितांचा आकडा वाढत आहे. लोकांनी कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळले नाहीत तर नाइलाजाने अधिक कठोर निर्बंध लागू करावे लागणार, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 

परेश रावल हे शर्मनजी नमकीन या चित्रपटासाठी शूटिंग करत होते. कोरोनावर मात केल्यानंतर ते पुन्हा एकदा काम सुरू करतील. या चित्रपटात आधी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर भूमिका साकारत होते. मात्र त्यांच्या निधनानंतर परेश रावल यांची निवड करण्यात आली. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन हितेश भाटिया करत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur cooperative elections : गोकुळ दूध संघासह कोल्हापूर जिल्ह्यातील ५१६ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार

Mumbai News: मुंबईतील राणीच्या बागेत गुजरातच्या सिंहाची गर्जना होणार; कधी? महत्त्वाची माहिती समोर

TRP पडला अन् 'ठरलं तर मग'मध्ये मोठी उलथापालथ; मालिकेत आणला सगळ्यात मोठा ट्विस्ट, प्रोमो व्हायरल

Japanese Beauty Secrets: वय वाढलं तरी त्वचा टवटवीत? जपानी महिलांच्या 5 ब्युटी सिक्रेट्स नक्की करा ट्राय

सासऱ्यांनी प्रॉपर्टीमधून बेदखल केलं, नणंदांनी केली कोर्ट केस ! मराठी अभिनेत्रीच्या आयुष्यात झालेली उलथापालथ

SCROLL FOR NEXT