Parineeti Chopra Instagram
मनोरंजन

Parineeti Chopra Affairs: शूट दरम्यान दिग्दर्शकाच्या प्रेमात पडलेली परिणीती, राघव चड्ढांआधी 'या' दोन जणांना केलंय डेट

परिणीती चोप्रा लवकरच आम आदमी पार्टीचे नेता राघव चड्ढा यांच्यासोबत साखरपुडा करतेय अशी चर्चा सध्या जोर धोरून आहे.

प्रणाली मोरे

Parineeti Chopra Affairs: सध्या बॉलीवूडमधला कोणता कलाकार जर आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असेल तर ती आहे परिणीती चोप्रा. गेल्या काही दिवसांपासून तिचं नाव आम आदमी पार्टीचे नेता आणि राज्यसभेचे सभासद राघव चड्ढा यांच्याशी जोडलं जात आहे. बातम्या तर अशा देखील आहेत की दोघे लवकरच साखरपुडा देखील करणार आहेत. अर्थात हे काही पहिल्यांदा घडत नाहीय,याआधी देखील परिणीती तिच्या अफेअर्समुळे चर्चेत आली आहे.

आता जेव्हा परिणीती आपल्या रिलेशनशीपमुळे लाइमलाइटमध्ये येतेच आहे तर चला जाणून घेऊया याआधी कोणा-कोणाशी परिणीतीचं नाव जोडलं गेलं आहे.

२०१३ साली परिणीतीचा सिनेमा आला होता 'शुद्ध देसी रोमान्स',ज्याला मनीष शर्मानं दिग्दर्शित केलं होतं. त्यावेळी काही दिवस दोघांच्या लिंकअप्सच्या बातम्या देखील रंगल्या होत्या. (Parineeti Chopra Affairs before raghav chadha)

मनीषसोबत परिणीतीच्या नावं जोडलं गेलं त्याची जोरदार चर्चा रंगली होती. पण एका मुलाखतीत परिणीतीला या रिलेशनशीपविषयी विचारले गेले तेव्हा तिनं स्पष्ट नकार देत त्या अफवांना 'बकवास' म्हटलं होतं.

मनीष शर्मानंतर परिणीतीचं नाव चरित देसाई सोबतही जोडलं गेलं होतं. मात्र या दोघांपैकी कोणीही आपल्या रिलेशनशीपवर बोललं नाही. हो,पण एकदा परिणीतीनं मात्र म्हटलं होतं की तिनं चरित सोबतच्या नात्याचा स्विकारही केलेला नाही ना त्याला नाकारलं आहे.

माहितीसाठी इथे सांगतो की चरित देसाई धर्मा प्रॉडक्शनचा असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहतो.

असो,भले मनीष आणि चरितसोबतचं परिणीतीचं नातं कधीच कन्फर्म होऊन समोर आलं नाही, मात्र राघव चड्ढांसोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत अनेकदा दोघे एकत्र स्पॉट केले गेले. तसं पाहिलं तर गायक हार्डी संधू आणि आम आदमी पार्टीचे नेता संजीव अरोरा यांच्याकडून दोघांना शुभेच्छाही मिळाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शैक्षणिक सहलींसाठी विद्यार्थ्यांसाठी सहलीत ५० टक्के सवलत; प्रत्येकास १० लाखांचा अपघात विमाही; एसटी महामंडळाचे आगारप्रमुख जाणार शाळांमध्ये

आजचे राशिभविष्य - 19 नोव्हेंबर 2025

Horoscope Prediction : आज तयार होतोय अमला राजयोग; मेष आणि या पाच राशींच्या आर्थिक अडचणींना लागणार पूर्णविराम !

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात रवा पिझ्झा बॉल ट्राय केले का? लगेच लिहून घ्या रेसिपी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT